Homeताज्या बातम्याविदेश

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या

न्यूयार्क ः अमेरिकेतील इंडियाना राज्यातील फिटनेस सेंटरमध्ये 29 ऑक्टोबर रोजी वरुण राज पुचा (24) या भारतीय तरुणावर हल्ला करण्यात आला होता. त्याचा ब

गजबजलेल्या चौकात जळतोय कचरा
सत्तांतराच्या हालचालींना वेग
गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना

न्यूयार्क ः अमेरिकेतील इंडियाना राज्यातील फिटनेस सेंटरमध्ये 29 ऑक्टोबर रोजी वरुण राज पुचा (24) या भारतीय तरुणावर हल्ला करण्यात आला होता. त्याचा बुधवारी मृत्यू झाला. जॉर्डन अँड्राडे (24)असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी पकडले आहे. मुळचा तेलंगणातील असलेला पी वरूण राज पुचा हा कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी होता. जॉर्डन अँड्राडेने पोलिसांना सांगितले की वरुण आणि तो एकमेकांशी हल्ल्यापूर्वी कधीही बोलले नव्हते. परंतु, वरूण धमकी देत असल्याचे कोणीतरी जॉर्डनला सांगितले. वरुण राज पुचा याच्या निधनाबद्दल आम्ही जड अंतःकरणाने दुःख व्यक्त करतो. आमच्या कॅम्पस समुदायाने एक विद्यार्थी गमावला आहे. असे निवेदन विद्यापीठाने जारी केले आहे.

COMMENTS