Homeताज्या बातम्याक्रीडा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघ जाहीर

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या फायनलसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाची घोषणा केली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाख

विराट कोहलीने तोडले सचिनचे तीन विक्रम
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून दीपक चहरची माघार ?
ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी विराट-अनुष्काची धार्मिक भेट

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या फायनलसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाची घोषणा केली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये जून महिन्यात फायनल मॅच खेळले. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी झालेल्या पहिल्या WTC च्या फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. आता टीम इंडियाला विजेतेपद मिळवण्याची आणखी एक संधी साधून आली आहे.

भारतीय संघातील खेळाडू सध्या आयपीएलचा १६ वा हंगाम खेळत आहेत. आयपीएल २८ मे पर्यंत चालेल, त्यानंतर भारतीय संघ WTC फायनलसाठी इंग्लंडला रवाना होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी ही लढत इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर ७ जूनपासून सुरू होईल. गेल्याच आठवड्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फायनलसाठीचा संघ जाहीर केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतात चार सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी झाली होती. ही मालिका भारताने २-१ने जिंकत WTC च्या फायनलमध्ये स्थान पक्के केले होते.

भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

COMMENTS