नेवासा येथील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी भारतीय लहूजी सेनेचे उपोषण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवासा येथील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी भारतीय लहूजी सेनेचे उपोषण

अहमदनगर/प्रतिनिधी : नेवासा तालुक्यातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे या मागणीकरिता भारतीय लहूजी सेनेने पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सोमवार दिनांक 10

नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ : केशवराव मगर
गर्दीचा फायदा घेऊन लहान मुलीच्या दागिन्याची चोरी 
दुचाकी व दूध टँकरच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी : नेवासा तालुक्यातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे या मागणीकरिता भारतीय लहूजी सेनेने पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सोमवार दिनांक 10 पासून उपोषण सुरू केले आहे.
नेवासा तालुक्यात चालू असलेले अवैध मटका दारु अड्डे, सोरट जुगार असे विविध प्रकारचे अवैध धंदे राजरोस खुलेआम चालू आहे. ते धंदे तात्काळ बंद करावेत याकरीता दि.20 डिसेंबर 2021 पासून भारतीय लहुजी सेनेच्यावतीने आमरण उपोषण केले होते, परंतु तीन दिवसांनंतरही पोलिसांकडून कुठलीही कार्यवाही झालेली नाही व धंदे बंद झाले नाही. अवैध धंदे बंद करण्यास नेवाशाची पोलिस यंत्रणा कुचकामी ठरली आहे. त्यामुळे भारतीय लहूजी सेनेने नेवासा येथे केलेले आमरण उपोषण स्थगित करुन पोलिस अधीक्षक कार्यालय समोर दि.10 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या नेवासा तालुक्यातील अवैध धंदे कायम स्वरुपी बंद करा, नेवासा तालुक्यातील अवैध धंदे बंद न करण्यार्‍या पोलिस निरीक्षक यांची तात्काळ बदली करा व नेवासा तालुक्यातील अवैध धंदे करण्यार्‍या मालकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना तत्काळ अटक करा, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहे. नेवासा तालुक्यामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून नेवासा तालुक्यातील अवैध धंदे करणार्‍या मालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर भारतीय लहुजी सेनेच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे. लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र त्रिभुवन, रज्जाक शेख, हनीफ पठाण, बाळासाहेब बागुल आदि उपोषणाला बसले आहेत. नेवासा तालुक्यामध्ये जुगार अड्डे सर्रासपणे सुरू आहे. राजरोसपणे असे प्रकार चालू असल्यामुळे एक प्रकारे नेवासा तालुक्यामध्ये अवैध धंद्यांना पोलीस प्रशासनाचे पाठबळ मिळत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वास्तविक पाहता हे अवैध धंदे बंद करावे, यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिले आहे. मात्र त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. तसेच, आम्ही 10 जानेवारीपासून येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाला बसू असा इशारासुद्धा दिला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS