Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय संविधान सक्षम : प्राचार्य बाळ कांबळे

सातारा / प्रतिनिधी : भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये दिशादर्शन केले आहे. तथापी, आतापर्यंतच्या वाटचालीचे अवलोकन करून भाष्य करणे अपरिहार्य

कराड-पाटण मार्गावर स्कॉपिओ-टेम्पो धडक; स्कॉपिओ चालक गंभीर
मेढा डेपोत नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा उत्साहात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा एसटीने प्रवास
स्व. एन. डी. पाटील यांच्या स्वप्नांच्या आड येणार्‍यांना धडा शिकवा : निशिकांत भोसले-पाटील

सातारा / प्रतिनिधी : भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये दिशादर्शन केले आहे. तथापी, आतापर्यंतच्या वाटचालीचे अवलोकन करून भाष्य करणे अपरिहार्य ठरते. तरीही लोकशाहीला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू शकत नाही. कारण, संपूर्ण विश्‍वात नंबर एक संविधान असून सक्षम आहे, असे प्रतिपादन प्राचार्य बाळ कांबळे यांनी केले.
येथील संबोधी प्रतिष्ठानतर्फे महात्मा फुले स्मृतीदिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण या कालावधीत होणारी थोरांच्या स्मृती-व्याख्यानमाला ’भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या विषय सूत्रावर गुंफली जात आहे. नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये राज्यशास्त्राचे अभ्यासक, धनंजयराव गाडगीळ कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी भारतीय संविधानाची वाटचाल या विषयाची अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली.
डॉ. बाळ कांबळे म्हणाले, आम्ही सार्वभौम आहोत याचा अर्थ आम्ही कुणाच्याही नियंत्रणाखाली अथवा दबावाखाली नाही. निर्णयक्षमता आढळून येत आहे. अंतर्गत व बाह्य सार्वभौमत्व यासंदर्भात बाह्य राष्ट्रांशी आपले सौहार्दाचे संबंध अद्याप टिकून आहेत. हे आपले यश आहे. भाषिक मुद्द्यावर आपण पुर्णतः सक्षम झालो आहोत. धर्मनिरपेक्षता या मुद्द्यावर भारताची वाटचाल टिकात्मक पण समाधानकारक आहे. राजकिय लोकसहभाग वाढतोय. हेही लोकशाहीचे अपयश नव्हे. तरीही भारतीय लोकशाहीत महिलांचा सहभाग आशादायक आहे.

COMMENTS