Homeताज्या बातम्यादेश

भारतीय हवाई विमान कोसळले

जीवितहानी नाही ; राजस्थानमध्ये कोसळून विमानाचा झाला कोळसा

नवी दिल्ली ः भारतीय हवाई विमान दलाचे विमान राजस्थानमध्ये कोसळल्याची घटना गुरूवारी घडली. मात्र सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही. राजस्थान

जेऊर पाटोद्यात बिबट्याने केली शेळीची शिकार
विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीला फटका बसणार : खा धनंजय महाडिक
देशात 9 हजार 355 नवे कोरोना रूग्ण

नवी दिल्ली ः भारतीय हवाई विमान दलाचे विमान राजस्थानमध्ये कोसळल्याची घटना गुरूवारी घडली. मात्र सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही. राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील एका गावात हवाई दलाचे विमान कोसळल्याची घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनासह हवाई दलाचे अधिकारी जिल्हा मुख्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या ढानी जजिया गावात पोहोचले होते.
सध्या अग्निशमन दलाच्या पथकाने विमान कोसळल्यामुळे लागलेली आग आटोक्यात आणली आहे. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. भारतीय हवाई दलाचे विमान राजस्थानमधील जैसलमेर येथे कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. विमान नियमितपणे उड्डाण करत होते. जैसलमेरच्या पिठाळा भागात हा अपघात झाला आहे.
हे विमान सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून होते, असे सांगितले जात आहे. पोलिस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितले की, ते हेरगिरी करणारे विमान असू शकते. विमान क्रॅश झाल्यानंतर त्यात मोठी आग लागली होती. त्यामुळे ते जळून राख झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. हवाई सेवेच्या या विमानात पायलट नसतात. ते रिमोट कंट्रोलने चालवले जाते. या विमानाचा वापर सीमा भागातील हेरगिरीच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो. जैसलमेरच्या पिठाळा गावाजवळ हे विमान मोठा स्फोट होऊन खाली कोसळले.

COMMENTS