विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला तरी, खर्या अर्थाने भारतच या स्पर्धेत विश्वविजेता राहिल्याचे दिसून येत आहे. सलग 10 स
विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला तरी, खर्या अर्थाने भारतच या स्पर्धेत विश्वविजेता राहिल्याचे दिसून येत आहे. सलग 10 सामने जिंकणारा भारतीय संघ 11 व्या स्पर्धेत पराभूत होतो, तर ऑस्ट्रेलियाचा संघ दोन सामने पराभूत होऊन शेवटचा सामना जिंकल्यामुळे त्यांना विश्वविजेचा घोषित करण्यात आले. खरंतर, या संपूर्ण विश्वचषकात भारताचे एकतर्फी प्रदर्शन करत विजय संपादन केला, शेवटचा सामना सोडल्यास. संपूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाज आणि गोलदांजाचे शानदार प्रदर्शन राहिले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीचा सामना सोडल्यास प्रत्येक सामन्यात शानदार प्रदर्शन केले. स्फोटक फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघावर दडपण टाकण्यात रोहित यशस्वी ठरला होता. मात्र शेवटच्या सामन्यात रोहितने खेळपट्टीचा अंदाज घेऊन खेळायला होते. रोहित ज्यावेळेस आऊट झाला, तो सामन्याचा टर्निग पॉईंट ठरला. कारण पहिल्या 10 ओव्हरमध्ये भारताने 80 धावा जमवल्या होत्या. या सामन्यात गिल आणि अय्यर, जडेजा, सूर्या ज्या पद्धतीने बाद झाले, त्याचवेळी सामना आपण गमावला होता. मात्र भारतीय गोलंदाज काही कमाल करतील अशी अपेक्षा होती. सुरूवातीच्या 10 ओव्हरमध्ये 3 विकेट घेऊन भारतीय गोलदांजांनी यश मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर खेळपट्टी फलदांजांना साथ द्यायला लागली. बॉल टर्नच होत नव्हता, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सहजरित्या खेळतांना दिसून आले. आणि ते विजयी झाले. खरंतर या स्पर्धेत रोहित शर्मा, विराट कोहली, अय्यर, केएल राहुल यांनी शानदार प्रदर्शन केले. तर दुसरीकडे मोहम्मद शमी, बुमराह, सिराज या गोलदांजांनी चांगली गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाना धडकी भरवली होती. खरंतर शेवटच्या सामन्यात भारत हा सामना दडपण घेऊन खेळल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर या सामन्यात भारताचा अभ्यास आणि खेळपट्टीशी जुळवून घेण्यास भारतीय संघ कमी पडला. अजून जर 40-50 धावा जास्त केल्या असत्या तर, कदाचित हा सामना भारतीय संघाकडे झुकला असता, मात्र जर तरच्या या गोष्टी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत. या सामन्यात रोहितने जडेजाच्या आधी सुर्याला खेळायला पाठवायला पाहिजे. मात्र तिथेही बदल केला, ज्यामुळे फायदा तर झाला नाही, मात्र नुकसानच झाले. या खेळपट्टीवर सेट झालेले फलंदाज आता मोठे शॉट मारून चांगली धावसंख्या उभारतील अशी अपेक्षा होती, ते फलंदाज बाद झाले. त्यामुळे भारतीय फलंदाजी कोसळतांना दिसून आली. हार-जीत हा खेळाचा प्रकार आहे, त्यात खिलाडूवृत्तीने तो आनंद लुटायला पाहिजे. मात्र संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाचेच वर्चस्व दिसून आले, शेवटचा सामना वगळता. आणि तोच सामना विश्वविजेता ठरवणार होता. असो, मात्र भारतीय संघाच्या पाठीमागे संपूर्ण देश उभा राहिला ते देखील महत्वाचे आहे.
विश्वचषकाचे नियम बदलण्याची गरज – विश्वचषक स्पर्धेत जगातील सर्व संघ सहभागी होत असून, या स्पर्धेत साखळी सामन्यानंतर, उपांत्य सामने आणि त्यानंतर फायनल सामना होतो. मात्र यामध्ये एखाद्या संघाने संपूर्ण सामन्यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्यानंतर शेवटच्या सामन्यात जर तो संघ पराभूत झाला तर, उपविजेता ठरतो. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत शानदार प्रदर्शन केलेल्या संघाला किती वेदना होत असतील, याची कल्पना न केलेली बरी. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेतील नियम बदलण्याची गरज आहे. विजेता संघ घोषित करण्यासाठी तीन सामने आयोजित करण्याची गरज आहे. यातील दोन सामने जो संघ जिंकेल त्यालाच विजेचा घोषित केल्यास संपूर्ण स्पर्धेत शानदार प्रदर्शन केलेल्या संघाला न्याय मिळू शकेल.
COMMENTS