Homeताज्या बातम्यादेश

भारत गुंतवणुकीकरता आदर्श ठिकाण : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारतात जपानच्या गुंतवणुकीला सुलभता आणि गती देण्यासाठी, भारताने स्थापित केलेल्या जपान प्लस ही व्यवस्थेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यां

शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त चित्रमयप्रदर्शन राज्यात आयोजित करावे : सहकार मंत्री
खंबाटकी घाटातील नवा बोगदा अंतिम खुदाईद्वारे खुला करण्यास प्रारंभ; पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी होणार कमी
तंत्रशिक्षणाबरोबर व्यवस्थापन शिक्षणात देखील आरआयटी अग्रेसर : डॉ. सुषमा कुलकर्णी

नवी दिल्ली : भारतात जपानच्या गुंतवणुकीला सुलभता आणि गती देण्यासाठी, भारताने स्थापित केलेल्या जपान प्लस ही व्यवस्थेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली. गुंतवणूकदारांच्या मनात कोणतीही संदिग्धता किंवा संकोच असू नये ही भारताची ठोस भूमिका मांडत भारत हा गुंतवणुकीकरता आदर्श ठिकाण असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीतील 7 लोक कल्याण मार्ग इथल्या आपल्या निवासस्थानी जपान असोसिएशन ऑफ कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह्स च्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. या भेटीत त्यांनी भारत आणि जपान दरम्यान आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठीचे त्यांचे विचार आणि सूचना समजून घेतल्या. कीझाई डोयुकाईचे अध्यक्ष ताकेशी निनामी यांच्या नेतृत्वातील या प्रतिनिधिमंडळासोबत जपानमधील 20 उद्योग व्यावसायिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार मजबूत करणे, गुंतवणुकीच्या संधी वाढवणे तसेच कृषी, समुद्री उत्पादने, अंतराळ, संरक्षण, विमा, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, नागरी विमानवाहतूक, स्वच्छ ऊर्जा, अणुऊर्जेसह लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील परस्पर भागीदारीसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला गेला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि जपान मधील विशेष धोरणात्मक तसेच जागतिक भागीदारीचा उल्लेख केला. त्यांनी भारताच्या उद्योग व्यवसाय स्नेही वातावरण निर्माण करण्याच्या दृढनिश्‍चयावरही पुन्हा एकदा भर दिला. देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात झालेल्या लक्षणीय विकासाची पंतप्रधानांनी माहिती दिली. भारत, नवीन विमानतळांची उभारणी आणि लॉजिस्टिक क्षमतेच्या विस्तारासह महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या दिशेने देखील काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतामधील मोठी विविधता लक्षात घेता, कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) परिप्रेक्ष्यात देश महत्त्वाची भूमिका बजावेल, असे पंतप्रधान म्हणाले. एआय च्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांबरोबर सहकार्य करण्यावर भर देत, त्यांनी भारताबरोबर भागीदारी करावी, असे आवाहन त्यांनी केले. जैवइंधनावर लक्ष केंद्रित करणारी मोहीम सुरू करून हरित ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, विशेषत: कृषी क्षेत्राच्या मूल्यवर्धनासाठी जैवइंधनाचा मोठा लाभ मिळणार आहे. पंतप्रधानांनी विमा क्षेत्र खुले करणे, आणि अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक क्षेत्रांमधील वाढत्या संधींचा उल्लेख केला.

COMMENTS