Homeताज्या बातम्यादेश

इराणमधील भारतीयांनी तात्काळ देश सोडावा

भारत सरकारची नागरिकांना कडक सूचनानवी दिल्ली : परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सोमवारी महत्त्वाची सूचना जाहीर करत इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारती

इराणने अणु कार्यक्रम पुन्हा सुरू केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल : ट्रम्प
इराणमधील तणावपूर्ण स्थिती; भारताने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
इराणमध्ये अडकले दोन हजार विद्यार्थी

भारत सरकारची नागरिकांना कडक सूचना
नवी दिल्ली : परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सोमवारी महत्त्वाची सूचना जाहीर करत इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना कोणत्याही उपलब्ध मार्गाने तात्काळ देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी 14 जानेवारी रोजीही अशाच प्रकारची सूचना देत नागरिकांना सावध राहण्याचे आणि परिस्थितीचा आढावा घेऊन इराणमधून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले होते.
मंत्रालयाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, इराणमध्ये राहणार्‍या भारतीयांनी अत्यंत सतर्क राहावे. ज्या ठिकाणी आंदोलने, निदर्शने किंवा तणावपूर्ण घटना घडत आहेत, त्या भागांपासून दूर राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच स्थानिक परिस्थितीबाबत अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी तेहरान येथील भारतीय दूतावासाशी सातत्याने संपर्क ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपली प्रवास व ओळख संबंधित कागदपत्रे – जसे की पारपत्र आणि ओळखपत्र – नेहमी स्वतःजवळ ठेवावीत, अशीही सूचना देण्यात आली आहे. इराणमध्ये असलेल्या सर्व भारतीयांनी तेथील भारतीय दूतावासात आपली नोंदणी करून घ्यावी. जे नागरिक स्वतः नोंदणी करू शकत नाहीत, त्यांच्या नातेवाईकांनीही दूतावासाशी संपर्क साधून आवश्यक माहिती द्यावी, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. इराणमधील परिस्थिती लक्षात घेता भारतीयांनी कोणतीही जोखीम न पत्करता सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.


आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर
989128109115
989128109109
989128109102
989932179359

COMMENTS