सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापणार : मंत्री अमित शहा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापणार : मंत्री अमित शहा

पुणे/प्रतिनिधी : स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत 22 सरकार सत्तेवर आली, मात्र सहकार मंत्रालय कुणीही स्थापन केले नाही. पंतप्रधान मोदी यांनी हे का

बनावट सोनेतारणात वापरला… बड्या सराफाचा शिक्का?
खबरदार! ५० टक्केला हात लावला तर !
कर्मवीर काळे विद्यालयाचा दहावीचा निकाल 95.6 टक्के

पुणे/प्रतिनिधी : स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत 22 सरकार सत्तेवर आली, मात्र सहकार मंत्रालय कुणीही स्थापन केले नाही. पंतप्रधान मोदी यांनी हे काम प्रथम करून दाखवले. मी या देशाचा पहिला सहकार मंत्री झालो. सहकार क्षेत्राची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे हे लक्षात घेता सहकार क्षेत्र अधिक बळकट केले जाईल. त्याचबरोबर सहकार क्षेत्रासाठी आता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा सरकारचा विचार असून देशात सहकार विद्यापीठांचे जाळे विणले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी केले. पुण्यातील वैकुंठभाई मेहता या राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत संस्थेत शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत 27 वा पदवीदान समारंभावेळी ते बोलत होते.
यावेळी शहा म्हणाले की, मोदींच्या काळातच देशातील पहिले सहकार मंत्रालय झाले. त्या माध्यमातून आता देशात सेंद्रीय शेती करणार्‍या शेतकर्‍यांची जबाबदारी सरकार घेणार आहे. त्यांच्या मालाचे विपणन व विक्री देश-विदेशात सरकार करून देईल. देशात जे शेतकरी सेंद्रिय शेती करत असतील, अशा शेतकर्‍यांना जागतिक दर्जाची बाजारपेठ उपलब्ध करून देत, त्यांचा माल आता सरकारच्यावतीने देश-विदेशात विकण्यास मदत करेल, अशी शहा यांनी केली.
दरम्यान, पुण्यात शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानित करण्याचं काम काँग्रेसने सातत्याने केलं. गैरकाँग्रेसी सरकार असतानाच बाबासाहेबांना भारत रत्न देण्यात आला. काँग्रेसची सत्ता असताना त्यांना भारतरत्न दिला गेला नाही. देशातील जनतेला बाबासाहेबांचे काम आणि त्यांची थोरवी कळू नये म्हणून काँग्रेसने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. जेव्हा जेव्हा आम्ही संविधान दिवस साजरा केला. त्या त्यावेळी काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला, असा हल्ला शहा यांनी काँग्रेसवर चढवला. स्वातंत्र्यानंतर संविधान बनिवण्यात बाबासाहेबांचे मोठं योगदान राहिलं आहे. सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर सर्वांना एकत्र आणण्याचं काम बाबासाहेबांनी केले. दलित वंचितांना संविधानातून संरक्षण देण्याचं काम त्यांनी केलं. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी अपमान सहन केला. कटु अनुभव घेतले. पण संविधान निर्मिती करताना त्यांनी कधी त्यात कटुता येऊ दिली नाही. जगभरात आपलं संविधान सर्वश्रेष्ठ आहे. सर्वांना समान अधिकार देणारं संविधान आहे हे केवळ बाबासाहेबांमुळेच घडू शकलं, असं शहा म्हणाले. मोदीही भारताच्या संविधानाला आपला ग्रंथ मानून देश चालवत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. जेव्हा देशात अंधारयुग होतं. आशेचा एक किरणही दिसत नव्हती. स्वराज्य आणि स्वधर्म शब्द उच्चारणंही जेव्हा कठिण होतं. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वेचलं. त्यांच्या या प्रयत्नामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील दोन तृतियांश शहरात स्वराज्य मिळवण्याचं सौभाग्य मिळालं, असं त्यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाद्वारे प्रशासनाची पायाभरणी केली. न्याय, नाविक दल, प्रशासकीय काम आदी गोष्टी त्यांनी प्रत्यक्षात उतरवल्या, असंही त्यांनी सांगितलं.

काँगे्रसकडून सातत्याने डॉ. आंबेडकरांना अपमानित केले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान लिहून या देशाला आकार दिला आहे. त्यांनी देशाच्या विकासासाठी आपले मोठे योगदान दिले आहेत. मात्र काँग्रेसने त्यांच्या हयातीत आणि नंतरही त्यांचा सातत्याने अपमान केला, असा घणाघात सहकार मंत्री अमित शहा केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे देखील लोकार्पण केले. त्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. ते म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानित करण्याचे काम काँग्रेसने सातत्याने केल्याची टीका त्यांनी केली.

COMMENTS