Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरी बायोरिफायनरीजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

कोपरगाव/प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लि. मध्ये मंगळवार दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी भारताचा स्वातंत्र्यिदि

ओबीसींचा प्रश्न निकाली काढा, अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा.. चिंतन बैठकीत इशारा l Lok News24
कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये उत्पादीत होणाऱ्या वस्तू देशभरात पोहचल्या : विवेक कोल्हे
जुन्या पेन्शनसाठी कृषी विद्यापीठात तिसर्‍या दिवशी कामबंद आंदोलन

कोपरगाव/प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लि. मध्ये मंगळवार दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी भारताचा स्वातंत्र्यिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारखाना कार्यस्थळावर डायरेक्टर सुहास गोडगे यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. गोदावरी बायोरिफायनरीज लि.मधील सर्व सुरक्षा अधिकारी,सोमैया विद्या मंदिर साकरवाडी, लक्ष्मीवाडी व शारदा इंग्लिश मेडियम स्कूल कोपरगाव येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक व शिस्तबद्द संचलन करून मानवंदना दिली.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद प्रत्येक भारतीयाने साजरा केला पाहिजे. स्वातंत्र्य मिळावे म्हणून,अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. त्यांच्या त्यागाला,आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांना अभिवादन आपण केले पाहिजे. असे आवाहन सुहास गोडगे यांनी उपस्थितांना केले.  स्वातंत्र्य दिनानिमित्त इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. सोमैया विद्या मंदिर साकरवाडी, लक्ष्मीवाडी व शारदा इंग्लिश मेडियम स्कूल कोपरगाव येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, गाणे, नाटक आणि शालेय विद्यार्थ्यांची भाषणे देखील समाविष्ट होती. या कार्यक्रमामध्ये माजी सैनिकांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी सर्व कामगार, अधिकारी, पंचकृशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी केले. तसेच आभार कामगार अधिकारी संजय कर्‍हाळे यांनी मानले.

COMMENTS