Homeताज्या बातम्या

नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात दशक्रिया विधी घालून बेमुदत आमरण उपोषण

इस्लामपूर / प्रतिनिधी : नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर युवा सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर तांदळे यांनी दाढी-केस कापून दशक्रिया विधी घालून निष्क्रि

निहॉन हिदानक्योला शांततेचा नोबेल पुरस्कार
सनी देओलने गुपचूप उरकला मुलाचा साखरपुडा
समाजमनावर झालेले संस्कार हेच आत्महत्येचे कारण!

इस्लामपूर / प्रतिनिधी : नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर युवा सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर तांदळे यांनी दाढी-केस कापून दशक्रिया विधी घालून निष्क्रिय कारभाराचा निषेध करुन उपोषणाला सुरुवात केली.
युवा सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर प्रकाशराव तांदळे यांनी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष,मुख्याधिकारी यांच्याकडे सातत्याने केलेल्या विविध मागण्या केल्या होत्या. या मागणीमध्ये उरुणवाडी या नगरला राजमाता जिजाऊनगर यांचे नाव देण्यात यावे. सांगली रोड लगतच्या कृषी उद्यानातील विविध आकारातील मुर्त्यांची डागडुजी व रंगरंगोटी करून त्या उद्यानास पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे. उरुणवाडीमध्ये स्वतंत्र पाण्याची टाकी बांधण्यात यावी. उरुणवाडीमधील सार्वजनिक स्मशानभूमीत निवारा शेड, दाहिनी शेड, वीज, पाणी आदी सोय तातडीने सोय करावी. सांगली रोड लगतच्या स्मशानभूमीत दोन दाहिनी जाळी, वीज, पाणी व कायमस्वरूपी सुरक्षारक्षक व रंगरंगोटी आदी सोयी सुविधा तातडीने करण्यात याव्यात. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर तांबोळी, अमोल कांबळे, आरपीआयचे अध्यक्ष अमर बनसोडे, महेश चौगुले, रणजीत बनसोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल करळे यांच्यासह अनेकजणांनी पाठींबा दिला.

COMMENTS