Homeताज्या बातम्यासंपादकीय

अपघाताचे वाढते प्रमाण…

जगभरात नव-नवे तंत्रज्ञान आले असले तरी, अपघातांची संख्या रोखण्यात आपण अपयशी ठरतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणार्‍या अप

साहित्यिकांचा रोष आणि पुरस्कार वापसी
मणिपूर हिंसाचारापुढे सरकारची हतबलता !
आश्‍वासनांची खैरात

जगभरात नव-नवे तंत्रज्ञान आले असले तरी, अपघातांची संख्या रोखण्यात आपण अपयशी ठरतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणार्‍या अपघातामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात प्रतिवर्षी अपघातात दीड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. महाराष्ट्रातही मागील वर्षी म्हणजे 2021 साली जानेवारी ते नोव्हेंबर या काळात 26 हजार 284 रस्ते अपघात झाले. त्यामध्ये 11 हजार 960 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जातात, परंतु तरीही अपघात कमी झाले नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अपघात रोखण्याचे मोठे आव्हान देशासमोर आहे. त्यासाठी नव-नवे तंत्रज्ञान विकसित होण्याची गरज आहे. त्यासोबतच वेगाला मर्यादा आणणे देखील गरजेचे आहे. वास्तविक पाहता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरतांना दिसून येत आहे. त्यातून होणारे मृत्यू, आणि होणारी समाजाची हानी न भरून निघणारी आहे. रस्ते रुंद आणि वेगवान झाल्यामुळे अत्याधुनिक वाहने रस्त्यावर धावतांना दिसून येत आहे. त्यांचा वेगही कमालीचा वाढला आहे. या वाढत्या वाहनांना रोखणे तसे अशक्य आहे, मात्र या वेगवान वाहनामुळे मोठया प्रमाणावर अपघात होतांना दिसून येत आहे. वेगाच्या या धुंदीत आपण हकनाक जीव गमावून बसतांना दिसून येत आहे. पूर्वीच्या काळी वाहनांची संख्या कमी होती. शिवाय वेगावर देखील मर्यादा होती. मात्र आता वेगाने मर्यादा ओलांडली आहे. अपघात झाला म्हणजे, तुम्ही जखमी नाही, तर जागेवरच गतप्राण व्हाल, अशीच गती या वाहनांची अलीकडे दिसून येत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर अपघात रोखण्याची मुख्य जबाबदारी आता वाहनचालकांवर आहे. सुरक्षित अंतर, सुरक्षित वेग आणि सुरक्षित प्रवास ही त्रिसूत्री अमलात आणली पाहिजे. वाहनांतील ब्रेकपेक्षा मनाचा ब्रेक हा अपघात टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, हेही लक्षात ठेवले पाहिजे तरच हे अपघात रोखता येईल. देशात दहशतवादी हल्ले होतात, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक व्यक्तींचा अपघातात मृत्यू होतांना दिसून येत आहे. अपघात कसे रोखता येईल, हा सर्वात मोठा प्रश्‍न असून, त्यादृष्टीने कठोर उपाययोजना आपल्याला कराव्या लागणार आहेत. मानवी चुकांमुळे होणारे अपघात नवीन नाही. मानवी चुकांना कसा लगाम घालता येईल, वेगावर कसे नियंत्रण ठेवता येईल, सीटबेल्ट लावणे कसे बंधनकारक करता येईल, याबाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. दररोज, या जिल्ह्यात, त्या तालुक्यात, अपघातांची मालिका सुरु आहे. त्यामुळे अपघात रोखणे मानवांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. एकीकडे तंत्रज्ञान वेगवान झेप घेत आहे. चारचाकी वाहनात मोठे बदल होत आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने या गाडया निकामीच ठरतांना दिसून येत आहे. गाडयांना जसा वेग प्रदान करण्यात येतो, त्याचप्रकारे त्यांना सुरक्षा देखील प्रदान करता आली पाहिजे. गाडीतील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. त्याशिवाय गाडी धावणारच नाही, असे तंत्रज्ञान उपलब्ध करावे लागणार आहे. गाडीची स्पीड मर्यादित ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे सामाजिक भान, आणि वाहनचालकांवर मर्यादा याद्वारेच आपण अपघात रोखू शकतो, अन्यथा या अपघातांना रोखणे सध्यातरी सहज शक्य नाही.

COMMENTS