Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. प्रदीप कुरुलकरांची होणार ‘पॉलिग्राफ टेस्ट’

पुणे/प्रतिनिधी ः पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय संरक्षण क्षेत्राची गोपनीय माहिती पुरविणार्‍या पुण्यातील डॉ. प्रदीप कुरुलकर कडून अधिक माहिती

बालेपीर भागातील निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशीची मागणी
कोपरगाव पोलिसांचा गोळीबार.. एक जखमी
भर पावसात खासदार हेमंत पाटील यांनी केली शेतीची पाहणी

पुणे/प्रतिनिधी ः पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय संरक्षण क्षेत्राची गोपनीय माहिती पुरविणार्‍या पुण्यातील डॉ. प्रदीप कुरुलकर कडून अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिस त्यांची पॉलिग्राफ टेस्ट करणार आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय संरक्षण क्षेत्राची गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाने डॉ. प्रदीप कुरुलकर यांना 4 मे रोजी पुण्यातून अटक केली होती.
पुणे शहरातील डीआरडीओ या संस्थेचे संचालक असलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांची हेरगिरी प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने 29 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, डॉ. प्रदीप कुरुलकर यांना हनी ट्रॅप अर्थात तरुणींच्या मोहजालात अडकवण्यासाठी ज्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क करण्यात आला तो मोबाइल भारतीय वायुदलातील शिपाई निखिल शेंडे याचा असल्याचे दहशतवादी विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. परंतु कुरुलकरांकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी त्यांची पॉलिग्राफ टेस्ट करण्याचे पोलिसांनी ठरवले आहे. पॉलिग्राफ टेस्टसाठी कुरुलकरांच्या कुटुंबीयांकडून संमती घेण्यात येईल, असे दहशतवादी विरोधी पथकाने न्यायालयाला सांगितले आहे. कुरुलकर यांचा मोबाइल व लॅपटॉप दहशतवादी विरोधी पथकाच्या ताब्यात असून तांत्रिक तपास करण्यात येत आहे.

COMMENTS