Preview attachment 1744108498412.jpg जामखेड : बाजार समित्या स्वच्छ असतील तर त्याचा थेट लाभ शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होतो. स्वच्छतेमुळे आरोग्
Preview attachment 1744108498412.jpg
जामखेड : बाजार समित्या स्वच्छ असतील तर त्याचा थेट लाभ शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होतो. स्वच्छतेमुळे आरोग्य सुधारतेच, पण वातावरण प्रसन्न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये जास्त दर देण्याची मानसिकता निर्माण होते, असे मत जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले. दि ८ एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती व जामखेड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ बाजार आवार अभियान’ राबवण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना राळेभात म्हणाले की,राज्यात सुरू असलेल्या १०० दिवसीय स्वच्छता मोहिम राबविण्यात येत. “स्वच्छता म्हणजेच देवता. स्वच्छ परिसरात देवाचा वास असतो,” असे सांगत त्यांनी बाजार समित्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. यावेळी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे,भारतीय जनता पार्टीचे नेते प्रा.मधुकर राळेभात,बाजार समितीचे सभापती पै.शरद कारले ,संचालक गौतम उतेकर, विष्णू भोंडवे, डॉ गणेश जगताप,सतिश शिंदे,डॉ सिताराम ससाणे,राहुलशेठ बेदमुथ्था, सुरेश पवार, रविंद्र हुलगुंडे तसेच संजय काशिद , बाजार समितीचे सचिव, बाजार समिती अधिकारी /कर्मचारी ,नगर परिषद कर्मचारी ,व्यापारी, हमाल कामगार वर्ग या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले की,नागरिकांच्या जीवनमानाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जामखेड नगर परिषद कायम तत्पर आहे.हा कार्यक्रम प्रतिनिधीक स्वरूपात नसून संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे . स्वच्छ जामखेड, सुंदर जामखेड तयार करण्याचा मानस आपण ठेवत आहोत. बाजार समितीचे सभापती पै. शरद कारले यांनी माहिती देताना सांगितले, “मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन बाजार परिसर अधिक स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाअंतर्गत बाजार समितीच्या आवारात स्वच्छतेवर भर देण्यात येणार असून, नियमित साफसफाई, निर्जंतुकीकरण, कचरा व्यवस्थापन आणि जनजागृतीसारख्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. बाजारात येणाऱ्या शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना स्वच्छ, आरोग्यदायी वातावरण निर्माण करून देण्याचा मुख्य उद्देश आहे.
COMMENTS