Homeताज्या बातम्यादेश

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली ः देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक असून, याप्रकरणी केंद्राने विविध राज्यांना उपाययोजना करण्याचे

येत्या काळात लोक ड्रोनने विमानतळावर जातील : नितीन गडकरी
मुंबई पोलिस भरतीची 23 जुलै रोजी लेखी परीक्षा
विरोधकांचा कामकाजांवर बहिष्कार

नवी दिल्ली ः देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक असून, याप्रकरणी केंद्राने विविध राज्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. कोरोनामुळे केरळमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णात तिप्पट वाढ झाली आहे. देशातील सहा राज्यात या विषाणूने शिरकाव केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. देशात सध्या 3 हजार 742 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत, तर 24 डिसेंबर रोजी देशातील सहा राज्यांत 63 रुग्ण जेएन-1 चे रुग्ण सापडले आहेत. यापैकी गोव्यात 34, महाराष्ट्रात 9, कर्नाटकात 8, केरळात 6, तामिळनाडूमध्ये 4 तामिळनाडू आणि 2 तेलंगणात सापडले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूच्या जेएन.1 या नव्या उपप्रकाराचे ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या गटात वर्गीकरण केले आहे. मात्र हा विषाणू लोकांच्या आरोग्यासाठी फार जोखीम निर्माण करणारा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार, जेएन.1 आरोग्यासाठी फार धोकादायक नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या लशी या विषाणूचा प्रतिकार करत असून रुग्णांना आरोग्याच्या धोक्यापासून वाचवत आहेत, असे निवेदन जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. याआधी जेएन.1 विषाणूचा मूळ वंश बीए.2.86 ला ही ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या गटात टाकण्यात आले होते.

COMMENTS