Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कमताला तांडा येथे डेंंगूच्या रुग्णात वाढ

वैद्यकीय अधिकार्‍याचे दुर्लक्ष

किनवट प्रतिनिधी - शहरापासून अगदी जवळ असलेल्या कमठाला तांडा येथे डेंगूच्या रुग्णात वाढ होत असलेले असून आरोग्य अधिकारी किंवा वैद्यकीय अधिकारी यांचे

मंत्री असतांना एमआयडीसीचा प्रश्‍न का सोडवला नाही
विवाहितेचा विनयभंग करणे आले अंगलट
उस्मानाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न | LokNews24

किनवट प्रतिनिधी – शहरापासून अगदी जवळ असलेल्या कमठाला तांडा येथे डेंगूच्या रुग्णात वाढ होत असलेले असून आरोग्य अधिकारी किंवा वैद्यकीय अधिकारी यांचे इकडे दुर्लक्ष होत असल्याचे  माजी सरपंच मारुती सुरोशे यांनी खंत व्यक्त केली. पाण्याची उघडझाप चालू असल्याने डेंगू सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन रुग्ण वाढतच असून त्वरित उपाययोजना न केल्यास रुग्णाची वाढ ही वाढतच राहील. तेव्हा तातडीने उपाय योजना करण्याची गरज असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस दहा कर्मचारी  डोअर टू डोअर भेटी देत 30 सॅम्पल नांदेड येथील लॅबला तपासणीसाठी पाठविले. आणि तेथील परिस्थितीवर आम्ही आणि आमची टीम लक्ष ठेवून आहोत. वैद्यकीय अधिकारी डॉ. आ ईटवार. राजगड यांनी स्पष्ट केले.

COMMENTS