Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खामगाव येथील सामान्य रुग्णालयातील मुलींच्या जन्मदरात वाढ

बुलढाणा प्रतिनिधी - समाजातील मुलींची कमी होत जाणारी संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. असे असताना येथील महात्मा ज्योतिबा फुले सामान्य रुग्णालया

शेतकर्‍यावर गावठी कट्टयाने झाडल्या सहा गोळ्या
अनिल देशमुखांची तुरुंगातून सुटका
Indapur : गांजा तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत (Video)

बुलढाणा प्रतिनिधी – समाजातील मुलींची कमी होत जाणारी संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. असे असताना येथील महात्मा ज्योतिबा फुले सामान्य रुग्णालयात जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२३ या एका वर्षाच्या कालावधीत जन्मलेल्या मुलांचा आकडा जरी अधिक असला तरी मुलींचा जन्मदर वाढलेला आहे. हा वाढलेला जन्मदर एक प्रकारे शुभवर्तमान म्हणावी लागेल. 

येथील सामान्य रुग्णालयात एक वर्षांच्या कालावधीत २ हजार ४४६ मुलांचा तर २ हजार ३२३ मुलींचा जन्म झाला आहे. मुलगा हा वंशाचा दिवा आहे, असे अनादी काळापासून बोलले जात आहे. त्यामुळे मुलगी असली तर तिची गर्भातच हत्या केली जात होती याचा विपरीत परिणाम आता गत काही वर्षांपासून दिसून येत आहे. प्रत्येक समाजात आज मुलांची संख्या कमी झाल्याने मुलाचे लग्न करायचे म्हटले की, मुलगी मिळणे कठीण झाले आहे. मुलींची कमी झालेली संख्या ही मुलाच्या पालकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. आम्हाला काही नको फक्त मुलगी द्या, असे म्हणण्याची वेळ अनेक मुलांच्या वडिलांवर आली आहे. मुले आणि मुली यांमध्ये भेद नको या नात्याचे महत्व नागरिकांना देखील कळू लागले आहे. त्यामुळे आत्ता गर्भलिंग तपासणी, गर्भपाताची संख्या कमी झाली आहे. एकेकाळी मुलाच्या जन्माचे स्वागत करण्यात येत होते. तसेच स्वागत मुलीच्या जन्माचे स्वागत केले जात असल्याचे चित्र समाजात पाहावयास मिळत आहे.

COMMENTS