दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश ; गोविंदांना शासकीय नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश ; गोविंदांना शासकीय नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण

मुंबई/प्रतिनिधी :गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सण-उत्सवांवर निर्बंध होते, त्यामुळे उत्सवाचा आनंद साजरा करता येत नव्हता. मात्र यंदा कोरोनाचा प्राद

खंबाटकी घाटातील नवा बोगदा अंतिम खुदाईद्वारे खुला करण्यास प्रारंभ; पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी होणार कमी
मस्तानी तलावात एक युवक पोहताना बुडून मृत्यू
भीषण अपघातानंतर चालकाला सहानुभूती कुणाची?

मुंबई/प्रतिनिधी :गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सण-उत्सवांवर निर्बंध होते, त्यामुळे उत्सवाचा आनंद साजरा करता येत नव्हता. मात्र यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी असून, राज्य सरकारने दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करत, गोविंदाना दिलासा दिला होता. त्यानंतर गुरुवारी राज्यसरारने दहिहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करत गोविंदा पथकांना सुखद धक्का दिला. या खेळात सहभागी खेळाडू अर्थात गोविंदांना शासकीय योजनांचा लाभही मिळणार आहे. यामध्ये गोविंदांसाठी शासकीय नोकर्‍यांमध्ये 5 टक्के आरक्षण असेल अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी याबाबत विधानसभेत निवेदन सादर केलं. ते म्हणाले, दहिहंडीवेळी जर एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाला तर त्याला शासनाकडून 10 लाख रुपये मदत देण्यात येईल. तसेच जर एखादा गोविंदा जबर जखमी झाला तर त्याला साडेसात लाख रुपये, अपघातात अपंगत्व आलं तर पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. राज्याच्या क्रीडा विभागाची अत्यंत महत्वाची बैठक झाली. त्यात ‘दहिहंडी’ या उत्सवाचा खेळात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर राज्यात ‘प्रो दहीहंडी’ हा खेळ सुरु होणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी दिली होती. स्पेन देशात मानवी मनोरे रचण्याचा खेळ खेळला जातो. त्यासाठी त्यांच्याकडे खेळाडूंना प्रशिक्षणही दिले जाते. स्पेनपेक्षा चांगले मानवी मनोरे आपली गोविंदा पथकं रचतात. त्यामुळेच त्यांचा क्रीडा प्रकारात समावेश केला जावा, अशी मागणी सातत्याने सुरू होती. राजकीय नेत्यांसह गोविंदा पथकेही गेल्या काही वर्षांपासून दहिहंडीला खेळाचा दर्जा देण्याची मागणी करत होते. या मागणली आता यश आले आहे. दरम्यान, राज्य सरकारने मंगळवारी (16 ऑगस्ट) दहिहंडीतील गोविंदा पथकांना 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता दहिहंडी उत्सवाला खेळाचा दर्जा मिळाला असल्याने गोविंदा पथकांनी आनंद व्यक्त केला आहे.

जखमी गोविंदांवर होणार मोफत उपचार
दहिहंडीवेळी किरकोळ अपघात झाल्यास गोविंदांवर महापालिका तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. याबाबत शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी सभागृहात ही मागणी केली होती. सुनिल प्रभू म्हणाले होते, दहिहंडीमध्ये आम्ही पण गेली अनेक वर्षे गोविंदा म्हणून काम केलंय. मुख्यमंत्र्यांनी गोविंदांना विमा लागू केला. पण किरकोळ मार लागेल त्यांना महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये जे काही उपचार होतील ते सर्व मोफत करण्याचे निर्देश द्या. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्णय घेत गोविंदाना दिलासा दिला.

COMMENTS