Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशमुख महाविद्यालयात वाड्.मय मंडळाचे उद्घाटन

अकोले ः राजूर येथील अ‍ॅड. एम.एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवारी प्रसिद्ध गझलकार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी म

पारनेर भाजपच्यावतीने सरकार विरोधात चक्काजाम आंदोलन l LokNews24*
नियमित पिक कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना अनुदान द्या – आ. आशुतोष काळे
दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन मंजूर

अकोले ः राजूर येथील अ‍ॅड. एम.एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवारी प्रसिद्ध गझलकार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख  डॉ.अविनाश सांगोलेकर यांच्या शुभहस्ते वाड्.मय मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उद्घाटक डॉ.अविनाश सांगोलेकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वाड्.मय मंडळाचे उद्घाटन केले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ.  अविनाश सांगोलकर यांनी गझल या वाड्.मय प्रकाराची परंपरा विशद करून गझलेचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. त्यांच्या अविनाश पासष्टी या त्यांच्या गझल संग्रहातील गझलांचे सादरीकरण केले. तसेच उर्दू फारशी या भाषेपासून गझलेची कशी निर्मिती झाली आणि मराठी साहित्यामध्ये गझल हा प्रकार कशाप्रकारे रूढ झाला याची माहिती त्यांनी दिली.तसेच या महाविद्यालयाचा परिसर अत्यंत निसर्गरम्य असून या परिसरात राहून वाचनाची सवय जोपासा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख असे म्हणाले की,  मोबाईल चा अतिरिक्त वापर वाढल्याने कौटुंबिक संवाद हरवला आहे, वाचन संस्कृती नष्ट होत आहे, आपले आयुष्य वाया न घालवता साहित्याची आवड जोपासा असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय वाड्.मय मंडळ विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. द.के. गंधारे यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बी. टी.शेणकर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा .ए.डी. सातपुते यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. पी.टी.करंडे, प्रा. डॉ.आर.डी. ननावरे, प्रा. बी.के. थोरात, प्रा.बी. आर. होले, विद्यार्थी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. के.जे.काकडे, प्रा. गणेश कुसमुडे श्याम पवार, करण ताठे, विलास लांघी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाड्.मय मंडळातील सर्व सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS