Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामगार सहकारी पतपेढीच्या नामविस्तार फलकाचे उद्घाटन

कोपरगाव तालुका ः तालुक्यातील वारी-साकरवाडी येथील दि गोदावरी बायो रिफायणारीज लिमिटेड साकरवाडी येथील कामगार संघटनेच्या ’कामगार सहकारी पतपेढी ’ या स

राहाता बस स्थानकाचा वर्धापन दिन उत्साहात
महिलांच्या आरोग्यावर संपुर्ण कुटुंबाचे आरोग्य निर्भर -संतोष माणकेश्‍वर
बँक खाजगीकरण मागे न घेतल्यास बेमुदत संप ; कर्मचार्‍यांचा इशारा, सलग दुसर्‍या दिवशी निदर्शने

कोपरगाव तालुका ः तालुक्यातील वारी-साकरवाडी येथील दि गोदावरी बायो रिफायणारीज लिमिटेड साकरवाडी येथील कामगार संघटनेच्या ’कामगार सहकारी पतपेढी ’ या संस्थेचे नुकतेच ’दि गोदावरी बायोरिफायणारीजची कामगार सहकारी पतपेढी’ असा नामविस्तार करण्यात आला असून फलकाचे अनावरण करण्यासाठी संस्थेच्या प्रांगणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
      भारतीय कामगार कर्मचारी संघ या संघटनेचे वर्चस्व असणार्‍या कामगार सहकारी पतपेढीचा ’दि गोदावरी बायोरिफायणरीजची कामगार सहकारी पतपेढी असा नामविस्तार करण्याचे कायदेशीर सोपस्कार पार पाडून विस्तारित नाम फलकाचे अनावरण कारखाण्याचे डायरेक्टर सुहास गोडगे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्तविक संचालक संदीप मारकळी यांनी केले तर चेअरमन सचिन टेके यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी संचालक सदस्य राहुल कोकाटे, वसंतराव वारकर,अशोक गजभिव, विजय गोंदकर ,मिलिंद हिवराळे महेश वालझडे आदी संचालक उपस्थित होते. याप्रसंगी दि गोदावरी बायो रिफायणरीज लि साकरवाडीचे डायरेक्टर सुहास गोडगे यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष नारायण वाळुंज यांचे हस्ते करण्यात आला तसेच कारखाना सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झालेले कर्मचारी वसंतराव वारकर,धोंडीराम हिवरे, विजय कोरके यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सरचिटणीस सुनिल महाले संघटनेचे उपाध्यक्ष गौतम मोरे, मधुकर गायकवाड ,विलास दाभाडे,कामगार सहकार वस्तु भांडरचे चेअरमन प्रदीप कपाटे, अशोक निकाळे, अनिल निकम, अनिल सिंग, विष्णु शेवरे, दत्ता शेलार, भगवान हुसळे विश्‍वनाथ साळवे, दौलत पाटील, संतोष जगताप, दादासाहेब वरकड, दत्तात्रय टेके, गोकुळ टेके, राजेश त्रिभुवन, बाळू त्रिभुवन, अजय मोकळ, अण्णा बैसाणे, बापु घुमरे, संतोष बनछोड, हेमंत दसनुरकर, किरण मोरे, किरण संसारे, पतपेढी सचिव अक्षय हासे, कामगार वस्तु भांडारचे व्यवस्थापक अविनाश भारूड, लखन सोनवणे, बाबुराव देशमुख आदी कर्मचारी पदाधिकारी यांचे सह मोठया संख्येने कामगार व अधिकारी उपस्थित होते शेवटी आभार अशोक गजभिव यांनी मानले.

COMMENTS