Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचा उपक्रम

पाथर्डी/प्रतिनिधी : बाबुजी आव्हाड महाविद्यालय,अहमदनगर डिस्ट्रिक्ट वेटलिफ्टिंग व अहमदनगर डिस्ट्रिक्ट आर्चरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयो

सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानचे कार्य वेगळ्या धाटणीचे
सारेगमप विजेती गौरीचा सोमेश्‍वर महादेव संस्थानकडून गौरव
भाविकाचा अपघातात मृत्यू; पाच जण जखमी

पाथर्डी/प्रतिनिधी : बाबुजी आव्हाड महाविद्यालय,अहमदनगर डिस्ट्रिक्ट वेटलिफ्टिंग व अहमदनगर डिस्ट्रिक्ट आर्चरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख क्रीडा शिक्षक प्रा. सचिन शिरसाट ,रावसाहेब मोरकर सर व सतीश डोळे सर तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
        सदर शिबीर 24 एप्रिल ते 6 मे 2023 या कालावधीत होणार आहे. या शिबिरामध्ये वेटलिफ्टिंग व पॉवरलिफ्टिंग खेळाचे प्रशिक्षण मुलांना महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व राष्ट्रीय खेळाडू कार्तिक तेवर हे देणार आहे. तर आर्चरी खेळाचे प्रशिक्षण राष्ट्रीय खेळाडू साईनाथ ढाकणे हे मुलांना देणार आहे. महाविद्यालयाच्या वतीने प्रथमच घेण्यात आलेल्या या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरासाठी पाथर्डीतील मुलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शुभारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विजय देशमुख यांनी केले तर  प्रा. सचिन शिरसाट यांनी आभार मानले

COMMENTS