कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे डॉ. प्रवीण जगताप व पूजा जगताप यांच्या शितल क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला. आई सीताबाई जगताप व वड

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे डॉ. प्रवीण जगताप व पूजा जगताप यांच्या शितल क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला. आई सीताबाई जगताप व वडील अंबादास जगताप यांच्या हस्ते बुधवारी सकाळी 11 वाजता हा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. सुहास सूर्यवंशी, सरपंच घन:शाम नेटके, बबनराव बागल, दत्ता म्हस्के, महावीर वाळुंज, योगेश गाडे, शंकरशेठ गदादे, विनोद कापरे, विलास ढवळे, विजय शिंदे, संजय जगताप, ज्ञानदेव शिंदे, राजेंद्र बारटक्के, आण्णा बागल, संतोष गुंड, भाऊसाहेब गुंड, सिद्धार्थ तुपेरे, राहुल मोरे, डॉ. संदीप चव्हाण, दादा घोडेस्वार, मोनिका गाडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. जगताप यांचे सध्या जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे क्लिनिक सुरु आहे. आपल्या गावातील लोकांनाही आपल्या शिक्षणाचा फायदा व्हावा व त्यांना जवळच उपचाराची सुविधा मिळावी यासाठी सकाळी व संध्याकाळी हे क्लिनिक सुरु राहणार असल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले.
COMMENTS