Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनचे कराड बस स्थानकासह कॉटेज हॉस्पिटलमध्ये उद्घाटन

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्धकराड / प्रतिनिधी : कराड शहर व भागातील महिलांसाठी एक अनोखं अभियान ’लायन्स क्लब

वारकर्‍याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी; दाम्पत्याचा जागीच अंत
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राज्यमंत्रीही घेणार शपथ
रयतच्या अध्यक्षपदी शरद पवार पुन्हा बिनविरोध

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध
कराड / प्रतिनिधी : कराड शहर व भागातील महिलांसाठी एक अनोखं अभियान ’लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्र’ यांच्या माध्यमातून कराड शहरात राबविण्यात आले. कराड शहरातील उपजिल्हा रुग्णालय व कराड बस स्थानक परिसरामध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन अ‍ॅण्ड इनसिनरेटर मशीन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध करण्यात आला. या अभियानाचे उद्घाटन आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एम. जे. एफ. एल. एन. सुनील सुतार, जमदग्नी, एल. एन. भोजराज, आर. सी. एल. एन. फडतरे तसेच या क्लबचे एल. एन. साळुंखे, डॉ महेश खुस्पे, अ‍ॅड. सतीश पाटील, अरुण देसाई, राजेश शहा, सौ. आशा चव्हाण, सौ. मंगल चव्हाण, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, प्रदिप दड्डा, अशोक दड्डा यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी लायन्स क्लब कराडच्या अध्यक्षा सौ. गौरी राहुल चव्हाण म्हणाल्या, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सोयीसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि इनसिनरेटर मशीन उभारणे गरजेचे असल्याने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाला. यामुळे हे मशीन कराड उपजिल्हा रुग्णालय व कराड बस स्थानक येथे उभारण्यात आले. या मशीनमधून महिलांना सॅनिटरी नॅपकिन मिळू शकतील. तसेच वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स अनेकदा डस्टबिनमध्ये किंवा उघड्यावर टाकले जातात. हे पॅड सुध्दा या मशीनमध्ये टाकले जाऊ शकतात. त्याची पूर्ण विल्हेवाट या मशीनमध्ये होते. त्यामुळे स्वच्छता राखण्यास मदत होईल.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लायन्स क्लबकडून समाजोपयोगी अनेक विविध उपक्रम राबविले जातात. यामधील हा एक उपक्रम जो या संस्थेकडून मांडण्यात आला. महिलांच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा हा उपक्रम लायन्स क्लबने हाती घेतला. या सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि इनसिनरेटर मशीनसाठी मी निधी उपलब्ध करून दिला. मतदारसंघात अनेक गोष्टींसाठी विकासनिधी उपलब्ध करून देता येईल. यावेळी लायन्स क्लबच्या मान्यवरांची भाषणे झाली.

COMMENTS