अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

अहमदनगर : अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ उद्या,२९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब

पाथर्डी शेवगाव महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धेला कर्मचाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
देवळाली प्रवरा नगर परिषदेचे वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला
बिहारमध्ये हिंसाचाराचा आगडोंब ; जेहानाबादमध्ये ट्रक-बस जाळली | DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर : अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ उद्या,२९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते तसेच ग्रामविकास व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.अशी माहिती या कार्यक्रमाचे निमंत्रक जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले व अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांनी दिली आहे.

मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महापौर सौ. रोहिणी शेंडगे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्री घुले पाटील, शिर्डी श्री.साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील, तसेच जिल्ह्यातील विधानसभा व विधानपरिषद चे सर्व सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

COMMENTS