मोताळा : राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या कोथळी शाखेचा १८ मे रोजी शुभारंभ झाला. अभिता कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सुनील शेळके व महाराष्ट्र
मोताळा : राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या कोथळी शाखेचा १८ मे रोजी शुभारंभ झाला. अभिता कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सुनील शेळके व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले. प्रारंभी महानायिकांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले. तसेच वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्यात आले. गोदाम पावती कर्ज सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.
मोताळा तालुक्यातील कोथळी हे एक मोठे गाव आहे. कोथळीला आजूबाजूची खेडी जोडली आहेत. राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेची शाखा सुरु झाल्याने शेतकरी, कष्टकरी व सामान्यांना बँकिंग सेवा सोयीची होणार असल्याच्या भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाला परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक हजर होते.
COMMENTS