Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकलव्य संघटनेच्या विभागीय संपर्क कार्यालयाचे ब्राम्हणगावात उद्घाटन

कोपरगाव - एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशाहून व प्रदेश महासचिव किरण ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली आदिवा

शिर्डीत रेड अलर्ट ! दहशतवादी कारवाईचा धोका.
स्पर्धा परीक्षेत कणगरचे विद्यार्थी चमकले पाहिजे – सुनील गाढे
बाबा आमटे विकास सेवा संस्था श्रीगोंदा येथे कला कार्यशाळा उत्साहात  

कोपरगाव – एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशाहून व प्रदेश महासचिव किरण ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली आदिवासी समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कोपरगांव तालुक्यातील ब्राम्हणगांव येथे एकलव्य संघटनेचे विभागीय संपर्क कार्यालयाचे रविवारी उदघाटन संपन्न झाले. या कार्यालयाचा आसपासच्या पंधरा ते वीस गावातील आदिवासी समाजाला फायदा होणार आहे.
या प्रसंगी प्रदेश संघटक अशोक माळी, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष भाऊराव पवार, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष गोरख नाईक, जिल्हा सदस्य राजू पवार, तालुका अध्यक्ष उत्तम पवार,टायगर फोर्स अध्यक्ष दिलीप पवार, युवा अध्यक्ष संजय पवार, चांगदेव माळी टायगर फोर्स कार्याध्यक्ष निलेश ठाकरे, ता. कार्याध्यक्ष बाळासाहेब मोरे, ता. उपाध्यक्ष विक्रम रजपूत, ता संघटक निलेश वाघ, विलास इंगळे, बबन गायकवाड, संजय पवार, पांडुरंग गायकवाड, रोहिदास पिंपळे, गोरख जाधव, वाल्मिक गोधडे, पंढरीनाथ जाधव, रंगनाथ रजपूत, मोहन रजपूत, गणेश बर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS