Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजकिशोर मोदी यांच्या उपस्थितीत सिमेंट रस्ता व इतर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक 10, मिलिंद नगर येथील सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचा तसेच त्याच भागात सिमेंटचे गट्टू बसविण्य

देशमुखांवरील आरोपांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी ; राज्य सरकार निर्णयाप्रत
समाजव्यवस्थेत अन्यायाविरुद्ध लढणारा,जाब विचारणारा ’फकिरा’ निर्माण झाला पाहिजे-डॉ.राजेश इंगोले
19 हजार कोटी कर्जमाफी निर्णयाचे गेवराई तुक्यात स्वागत

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक 10, मिलिंद नगर येथील सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचा तसेच त्याच भागात सिमेंटचे गट्टू बसविण्याच्या कामाचा शुभारंभ अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मिलिंद नगर प्रभागातील अनेक जेष्ठ नागरिक तथा युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक महादेव आदमाने, सुनील व्यवहारे,धम्मा सरवदे, कचरूलाल सारडा,सुनील वाघाळकर, गणेश मसने,जावेद गवळी, दत्ता सरवदे,खलील जाफरी, मतीन जरगर , महेबूब गवळी, मामा जोगदंड, कैलास कांबळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
मिलिंद नगर परिसरातील बरीच कामे काही  दिवसांपासून प्रलंबित होती . या प्रलंबित कामामुळे तेथील नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत होती. मागील दीड ते पावणे दोन वर्षापासून अंबाजोगाई नगर परिषदेच्या सर्व पदाधिकारी यांची मुदत संपल्याने  नगर परिषद कार्यालयाचा कार्यभार प्रशासक या नात्याने नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे पहात आहेत. त्यामुळे शहरातील बरीच विकासकामे ही खोळंबून पडली आहेत व याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशाच काही प्रलंबित कामाचा शुभारंभ आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.सिमेंट रस्ता व गट्टू च्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकार्‍यांनी गवळी पुरा येथील शादीखाण्याची पाहणी केली. शदिखान्यातील देखील काही प्रमाणात निर्माण होत असलेल्या गैरसोयी येत्या काळात दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे राजकिशोर मोदी यांनी येथे सांगितले. त्यानंतर मिलिंद नगर येथील नालंदा बौद्ध विहारास भेट देऊन तेथील तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस अभिवादन केले. नालंदा बौद्ध विहारात जाऊन तिथल्या देखील अडीअडचणी व परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या . नागरिकांनी उभा केलेल्या विविध प्रश्नांची उकल आगामी काळात प्राधान्याने करण्याचे आश्वासन याप्रसंगी राजकिशोर मोदी यांनी दिले . या कार्यक्रमावेळी या परिसरातील अक्षय शिंदे, विष्णू जोगदंड, पब्लिक मस्के, रफिक गवळी, अमित चौधरी, हुसेन रेगीवाले, शुभम कांबळे, राजू उजगरे, बाबा वाघमारे यांच्यासह अनेक युवक व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

COMMENTS