Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक शहरात पहिल्यांदाच ४६ आरोग्य मंदिर चे लोकार्पण :- डॉ भारती पवार 

नाशिक - केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते नाशिक येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर लोकार्पण

माननीय पंतप्रधान मोदींजींच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भरतेकडे : डॉ भारती पवार
परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार
निरोगी शरीर राहण्यासाठी जीवनात व्यायामाला मोठे महत्त्व :- डॉ भारती पवार

नाशिक – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते नाशिक येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न झाला. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १०६ नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर उभारण्यात येणार आहेत त्यातील एकूण ४६ आयुष्यमान आरोग्य मंदिराचे डिजिटल पद्धतीने लोकार्पण डॉ भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. आयुष्यमान आरोग्य मंदिर च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा मोफत मिळणार आहे. तसेच नोंदणी शुल्क घेतल्या जाणार नाही. प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक सेवा यामार्फत उपलब्ध होतील. तसेच बाह्यरुग्ण सेवा, गरोदर माता तपासणी, लसीकरण (माता व बालक), उच्च रक्तदाब व मधुमेह निदान व उपचार आदी सोयी दिल्या जाणार आहे. तसेच आवश्यक निवडक रक्त तपासणी ही  मार्फत करण्यात येणार आहे. यामाध्यमातून नागरिकांना चांगल्या सोयी मिळतील व नागरीक मोठ्या संख्येने लाभ घेतील याबद्दल डॉ भारती पवार यांनी विश्वास व्यक्त केला.

यावेळी सुनीता पिंगळे, डॉ प्रशांत भदाने,मनपा आयुक्त अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे , प्रदीप चौधरी , उपायुक्त विजयकुमार मुंडे,उपायुक्त श्रीकांत पवार, श्री नितीन मुंडे ,निती, वंजारी साहेब, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ तानाजी चव्हाण, डॉ अमिता साळुंखे, डॉ नितीन रावते, डॉ प्रशांत शेटे सह नागरिक उपस्थित होते.

COMMENTS