Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 येवला शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेतर्फे शहरातील मुख्य नाले सफाई मोहिमेस सुरुवात

नाशिक प्रतिनिधी - येवला शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेतर्फे शहरातील मुख्य नाले सफाई मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. मुख्याधिकारी

गणेश मंडळांना गतवर्षीचाच परवाना यंदाही चालणार
महापालिकेने केला डॉक्टरांचा सन्मान ; मनपा आरोग्य समितीचा पुढाकार
कर्णधार टेंबा बवुमा ठरला दक्षिण आफ्रिकेसाठी खलनायक!

नाशिक प्रतिनिधी – येवला शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेतर्फे शहरातील मुख्य नाले सफाई मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक नागेंद्र मुतकेकर यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छता निरीक्षक सागर झावरे यांच्यासह येवला नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी या मोहिमेत सहभागी असून शहरातील प्रमुख मोठे नाले हे जे.सी.बी मशिन तसेच पोकलेनच्या साह्याने सफाई करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण शहरातील नालेसफाई करता कर्मचाऱ्यांचे दोन पथक नेमण्यात आले आहेत. तरी 31 मे पर्यंत पूर्ण नाले सफाई करण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक यांनी दिली आहे.

COMMENTS