Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीच्या निकालात यंदाही मुलींचीच बाजी

निकाल 93.27 टक्के कोकण विभाग अव्वल

पुणे ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदाही अपेक्षेप्रमाणे मुलींनी बाजी मारत आपण

भाजपचे टगे शिवरायांचा अपमान करून महाराष्ट्राला शहाणपण शिकवतात  
राष्ट्रीय लोकअदालतीला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; 13 हजार 177 प्रकरणे निकाली
शहराच्या वैभवात भर पडेल असे काम करा ः उपमुख्यमंत्री पवार

पुणे ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदाही अपेक्षेप्रमाणे मुलींनी बाजी मारत आपणच अव्वल असल्याचे सिद्ध केले आहे. राज्यात बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आली. यंदा राज्यात बारावीचा निकाल 93.37 टक्के लागल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

नऊ विभागीय मंडळात कोकण विभाग अव्वल ठरले असून, या विभागाचा निकाल 97.91 टक्के तर सर्वात कमी मुंबई 91.95 निकाल लागला आहे. यावेळी अधिक माहिती देतांना गोसावी म्हणाले की, यंदा बारावीच्या परीक्षे गैरप्रकार घटले असून,प्राथमिक शिक्षण विभाग माध्यमातून 271 भरारी पथके कार्यरत होती. तसेच जिल्हा स्तरावर देखील भरारी पथके तैनात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्यास कोणत्या शिक्षा होऊ शकते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. अंतर्गत परीक्षेचे गुण ऑनलाईन घेतल्यामुळे निकाल लवकर जाहीर होण्यास मदत झाली आहे. राज्यात नियमित, दिव्यांग, पुर्नपरीक्षा, असे एकूण 15 लाख 20 हजार 181 विद्यार्थी यांनी नोदंणी केली. त्यापैकी 15 लाख नऊ हजार 848 विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी 13 लाख 87 हजार 125 विद्यार्थी पास झाले आहे. यंदा नियमित विद्यार्थी 14 लाख 33 हजार 371 विद्यार्थी यांनी परीक्षा नोंदणी केली त्यापैकी 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थी यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे यंदा नियमित विद्यार्थी परीक्षा निकाल 93.37 टक्के लागला आहे. या परीक्षेत दिव्याग विद्यार्थी निकाल 94.20 टक्के आहे. एकूण निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल 95.44 टक्के तर मुलांचा निकाल 91.60 टक्के निकाल आहे.

तनीषाने मिळवले शंभर टक्के गुण – 100 टक्के गुण मिळवत छत्रपती संभाजीनगरची विद्यार्थिनी तनीषा सागर बोरामणीकर ही राज्यात अव्वल आली आहे. तिला एकूण 582 गुण तिला मिळाले आहेत. तिला 18 मार्क खेळात मिळाले आहेत. एकूण 600 पैकी 582 गुण तिला मिळाले आहेत. ती छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेजमध्ये शिकते.

नऊ विभागाचा निकाल
पुणे – 94.44 टक्के
नागपूर – 92.12 टक्के
संभाजीनगर -94.08 टक्के
मुंबई – 91.95 टक्के
कोल्हापूर – 94.24 टक्के
अमरावती – 93 टक्के
नाशिक – 94.71 टक्के
लातूर – 92.36 टक्के
कोकण -97.51 टक्के

मुलांपेक्षा 3.84 टक्के अधिक मुली पास – बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरला असून यंदाही बारावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली अग्रेसर आहेत. यावर्षी 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणार्‍या मुलांचे प्रमाण 91.60 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणार्‍या मुलांपेक्षा 3.84 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.  

गुणपडताळणीसाठी 05 जूनपर्यंत मुदत – निकाल हाती आल्यानंतरही अनेकांना आपल्या निकालाविषयी आक्षेप असू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी, गुणांच्या पडताळणीसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरुन (हीींिं:/र्/ींशीळषळलरींळेप.ाह- हील.रल.ळप) विद्यार्थ्यांना स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फे अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती आणि सूचना वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी 22 मे ते 5 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

COMMENTS