Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. राजाराम माने

सातारा / प्रतिनिधी : विविध प्रकारचे संशोधन करणार्‍या जगभरातील शास्त्रज्ञांचे आंतरराष्ट्रीय मूल्यांकन करून सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांची यादी अमेरिक

विकास आघाडीतर्फे 11 कोटी निधीला विरोध करणार्‍या नगरसेवकांच्या दारात ढोल-ताशांचा गजर
फलटण येथे जुगाराच्या अड्ड्यावर छापा; 12 जणांविरोधात गुन्हा दाखल
राजभवनाच्या नावाने बँकेत खाते नसल्याने पैसे पक्षाला दिल्याचा न्यायालयात युक्तीवाद

सातारा / प्रतिनिधी : विविध प्रकारचे संशोधन करणार्‍या जगभरातील शास्त्रज्ञांचे आंतरराष्ट्रीय मूल्यांकन करून सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांची यादी अमेरिकेतील विश्‍वविख्यात स्टॅनफोर्ड विद्यापीठाने केली आहे. या यादीत मायणीचे सुपुत्र डॉ. राजाराम माने यांचा समावेश आहे. डॉ. माने हे सध्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे भौतिकी विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
सामान्य शेतकरी कुटुंबातून, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत डॉ. माने यांनी संशोधन क्षेत्रात गरूड भरारी घेतली आहे. दक्षिण कोरियातील हनयांग विश्‍वविद्यालयात त्यांनी संशोधनास सुरुवात केली. त्यांना कोरियाच्या राष्ट्रीय विज्ञान आणि इंजिनिअरिंग फाउंडेशनकडून ब्रेन पूल फेलोशिप मिळाली. त्यांनी मुख्यत: नॅनो टेक्नॉलॉजीवर संशोधन केले. त्याची दखल घेत कोरिया सरकारने त्यांना ‘फर्स्ट फॉरेन रिसर्च’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. हनयांग विद्यापीठात त्यांनी निमंत्रित प्राध्यापक आणि कोरियाच्या राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेवर निमंत्रित शास्त्रज्ञ म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधन समितीवरही डॉ. माने यांनी काम केले आहे. नॅनो टेक्नॉलॉजीवरील सखोल संशोधनाच्या निमित्ताने त्यांनी अमेरिका, चीन, युरोप, इंग्लंड, जपान या देशांना भेटी दिल्या आहेत. भारत सरकारने त्यांना यंग सायंटिस्ट पुरस्काराने तर भारती विद्यापीठाने बेस्ट रिसर्च अ‍ॅण्ड पेटंटी पुरस्काराने सन्मानित केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ डीन अ‍ॅण्ड डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ रिसर्च, बोर्ड ऑफ नॅशनल अ‍ॅण्ड इंटरनॅशनल लिंकेज, बोर्ड ऑफ इनोव्हेशन इनक्युबेशन अ‍ॅण्ड इंटर प्राइस या चार समितीवर सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने प्रसिध्द केलेल्या यादीत अन्य देशांच्या तुलनेत भारतीय शास्त्रज्ञांचा टक्का फारच कमी आहे. बहुतेकजण राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये कार्यरत असणारे शास्त्रज्ञ आहेत. त्यामुळे मानाच्या शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल डॉ. राजाराम माने यांचे कौतुक होत आहे.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले, उपकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, रजिस्टार डॉ. सर्जेराव शिंदे, डीन डॉ. एल. एम. वाघमारे यांच्यासह मायणीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. माने यांनी पंचाहत्तरहून अधिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शास्त्रज्ञांबरोबर काम केले आहे. 400 शोधनिबंधांसह 351 शोधपत्रिका, चार आंतरराष्ट्रीय पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांनी सादर केलेल्या 20 पेटंटचे पुनरावलोकन सुरू आहे. मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती करण्याचे त्यांचे संशोधन जागतिक स्तरावर नावारूपास येत आहे.

COMMENTS