कोपरगाव तालुका ः कोपरगाव शहरातील खडकी येथे राहणार्या गणेश उत्तम शिरसाठ यांच्या राहात्या घराला गुरुवार 2 मे रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारा

कोपरगाव तालुका ः कोपरगाव शहरातील खडकी येथे राहणार्या गणेश उत्तम शिरसाठ यांच्या राहात्या घराला गुरुवार 2 मे रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास लागलेल्या अचानक आगीमुळे घरातील संसार उपयोगी वस्तू तसेच दुचाकी टीव्ही व इतर दैनंदिन वापरातील साहित्य जळून खाक झाले आहे.
अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला आगीचे लोट एवढे मोठे होते की यामध्ये अक्षरशः एक दुचाकी व सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहे, परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ कोपरगाव नगरपालिका अग्निशमन व तसेच सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखाना यांच्याशी संपर्क साधला,, तात्काळ आग विझवण्यासाठी अग्निशामक दाखल झाल्याने यामुळे मोठा अनर्थ टळला यामध्ये घरातील संसारिक वस्तू जळून खाक झाल्या असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकलेले नाही या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
COMMENTS