नाशिक - माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आणि माजी उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त

नाशिक – माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आणि माजी उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला ‘पुष्पहार’ अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.
या अभिवादन कार्यक्रमास अपर आयुक्त निलेश सागर, उपायुक्त (महसूल) रमेश काळे, श्री निलेश सागर अपर आयुक्त, श्री उपायुक्त (नियोजन) मच्छिंद्र भांगे, उपायुक्त (भुसुधार) विठ्ठल सोनवणे उपायुक्त (नगरपालिका) संजय दुसाने, प्रबोधिनीच्या संचालिका जयरेखा निकुंभ, उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वरी इगवे, उपायुक्त (चौकशी) डॉ. सारिका बारी उपस्थित होते.
यावेळी श्री.भट यांनी माजी प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी व वल्लभभाई पटेल यांच्या विषयी माहिती उपस्थितांना दिली.
COMMENTS