अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई उप प्रादेशिक परिवहन कार्यालय हे मागील अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे.या कार्यालयातील प्रत्येक अधिका
अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई उप प्रादेशिक परिवहन कार्यालय हे मागील अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे.या कार्यालयातील प्रत्येक अधिकारी व कर्मचार्यांनी हाताखाली स्वतंत्र दलाल ठेवले आहेत. या दलालाच्या माध्यमातून अधिकारी राजरोसपणे भ्रष्टाचार करत आहेत.नेमलेल्या दलाला ने अधिकार्यां समोर पेपर ठेवला तरच अधिकारी विना कागदपत्र तपासता डोळेझाक पणे सह्या करतो. याउलट एखादा व्यक्ती पूर्ण अचूक कागदपत्रे घेऊन स्वतः अधिकार्यां समोर गेला तर त्रुटी नसताना त्रुटी काढून सह्या केल्या जात नाहीत.
दलाला शिवाय अंबाजोगाई उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एखादी फाईलच काय तर काय एक कागदही इकडचा तिकडं होत नाही त्यामुळे दलालाची अरेरावी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याशिवाय ऑनलाईन परीक्षेत मोठा घोळ होत असून परीक्षार्थीच्या जागी प्रत्यक्ष कार्यालयातील नेमलेला खाजगी एजन्ट बसवून परीक्षेत पास केले जात आहे. यात पास करण्यासाठी पैसे घेतले जातात. कार्यालयातील अधिकार्यांनी नेमलेले साधारणतः 8 दलाल आहेत त्या मार्फत अधिकारी दलालाच्या माध्यमातून राजरोस पणे भ्रष्टाचार करतात. अंबाजोगाई उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नेमलेले दलाल अनेक महत्वाच्या फाईल्स कागदपत्रे अधिकारी राहतात तिथे सह्यासाठी घेऊन जातात अशी माहिती कार्यालयातील खाजगी एजन्ट नी दिली.अनावधानाने जर यापैकी फाईल्स गहाळ झाल्या तर याची जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी घेणार का ? प्रामुख्याने कार्यालयातील फक्त शासकीय अधिकारी यांच्याकडे असणारे गोपनीय साईट व त्याचे गोपनीय पासवर्ड या दलालाकडे आहेत याचा गैरफायदा घेऊन हे दलाल लाखोंचा भ्रष्टाचार करत असल्याची माहिती कार्यालयात काम करणार्या एका खाजगी दलालाने सांगितली आहे.अशे गैरकृत्य होत असताना आम्ही अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रभारी अधिकार्यास विचारले असता त्यांनी उत्तर न देता शांत राहणे पसंद केले. या शांततेच भ्रष्टाचार दडला असून या दलाला मार्फत कार्यालयातील अधिकारी भ्रष्टाचार करतात का नाही हे त्या प्रभारी अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणे गरजेचे आहे.या कार्यालया बाहेर खाजगी काम करणार्या दलाला सोबत अधिकार्यांचे अनेकदा भांडण मारामार्या होऊन सुद्धा अधिकारी त्यांची पोल खोल होईल या भीतीने गुन्हा दाखल करत नाहीत अश्या चर्चा आहेत.दरम्यान कार्यालयात नेमलेले 8 दलाल कार्यालयाबाहेर काढणे गरजेचे आहे.
COMMENTS