Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोयत्याच लोण शाळांपर्यत, दहावीचा पेपर सुटला अन् विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला 

नाशिक प्रतिनिधी - नाशिक मध्ये कोयता गँगची दहशत असून दिवसाआड कोयता गँगच्या  घटना घडत आहेत. यात अल्पवयीन मुलांपासून ते सराईत गुन्हेगारांपर्यत सर्

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये ५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे  – आ. राम सातपुते 
माय मराठीला  सातासमुद्रापार घेऊन जाणारी मानवधन संस्था जपतेय मातृभाषेचा वसा
सोलापूर आणि पंढरपूर रेल्वे स्थानकावर जागतिक हेरिटेज दिन साजरा

नाशिक प्रतिनिधी – नाशिक मध्ये कोयता गँगची दहशत असून दिवसाआड कोयता गँगच्या  घटना घडत आहेत. यात अल्पवयीन मुलांपासून ते सराईत गुन्हेगारांपर्यत सर्रास प्राणघातक हल्ले केले जात आहेत. अशातच कोयता गँगने चक्क शाळेतल्या मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना नाशिक शहरात उघडकीस आली आहे. 

नाशिक शहरात ज्यापद्धतीने गुन्हेगारी  घडत आहे, त्यावरून शहरात पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे चित्र आहे. राजरोसपणे हल्ला, मारहाण, गोळीबार, खून अशा घटना घडत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक भीतीच्या सावटाखाली आहे. दोन दिवसांपूर्वी अंबड परिसरात कोयता घेऊन दहशत पसरवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एका शाळकरी मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दहावीचा पेपर सुटल्यानंतर मित्रांसोबत घरी जात असताना एका दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर आठ ते दहा जणांकडून कोयत्याने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

COMMENTS