सांगली / प्रतिनिधी : विधानसभेच्या धक्कादायक निकालामध्ये सांगली जिल्ह्याचाही नंबर लागला. सांगलीतून सुधीर गाडगीळ 36 हजार, शिराळ्यातून सत्यजित देशमुख 22
सांगली / प्रतिनिधी : विधानसभेच्या धक्कादायक निकालामध्ये सांगली जिल्ह्याचाही नंबर लागला. सांगलीतून सुधीर गाडगीळ 36 हजार, शिराळ्यातून सत्यजित देशमुख 22 हजार, मिरजेतून डॉ. सुरेश खाडे 45 हजार, तासगावमधून रोहित पाटील 30 हजार, खानापूरमधून सुहास बाबर 77 हजार, कडेगाव मधून विश्वजीत कदम 30 हजार, इस्लामपूरमधून जयंत पाटील 13 हजार, जतमधून गोपीचंद पडळकर विजयी झाले.
यंदाच्या निवडणूकीत लोकसभेच्या विरुध्द मतदारांनी कॉल दिला. सांगलीत वसंतदादा घराण्याला मोठा धक्का बसला असून जयश्रीताई पाटील यांचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली. पश्चिम महाराष्ट्रातून आमदार विश्वजीत कदम हे एकमेव काँग्रेसकडून विजयी झाले. भाजपचे डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सुहास बाबर, गोपीचंद पडळकर यांची नावे मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. लाडक्या बहिणीच्या तडाख्यातून जयंत पाटील थोडक्यात बचावले. निशिकांत पाटील यांनी त्यांना चांगलाच घाम फोडला होता.
COMMENTS