Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्नीच्या स्मरणार्थ आठवणींचे मूल्य संवर्धित!

लहू मस्के : साठे जयंतीत भोजनदान देवून जोपासला बंधूभाव

बीड प्रतिनिधी - सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी पत्नी व्रत करते. परंतु पत्नीनेच अर्ध्यावरती साथ सोडली,पत्नी देवाघरी निघून गेली तरी पतीच पत्नीवरच

ओडिशात 8 भाविकांचा अपघातात मृत्यू
वैष्णोदेवीनंतर शाहरुख खान साईबाबांच्या नगरीत दाखल
सातार्‍यातील महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रमाची आता राज्यभरात अंमलबजावणी : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांना यश

बीड प्रतिनिधी – सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी पत्नी व्रत करते. परंतु पत्नीनेच अर्ध्यावरती साथ सोडली,पत्नी देवाघरी निघून गेली तरी पतीच पत्नीवरच प्रेम थोडही कमी झालेलं नाही. लहू एकनाथ मस्के यांनी पत्नी रेखाच्या आठवणींना उजाळा देत, तिचे माहेर असलेल्या माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीत भोजनदान देवून लहू मस्के यांनी पत्नीच्या स्मरणार्थ तिच्या आठवणींचे मूल्य संवर्धित करुन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
हुडा कवडगाव (ता.परळी) येथील लहू मस्के यांची पत्नी रेख यांचे काही महिन्यापूर्वी आकस्मिक निधन झाले,अर्ध्यावरती सोडून गेलेली पत्नीची आठवण कायम स्मरणात रहावी यासाठी लहू मस्के यांनी पत्नी रेखा मस्के यांच्या स्मरणार्थ तिच्या गावासाठी काहीतरी भेट म्हणून देण्याचे ठरविले त्यानुसार साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीत भोजनदान देवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. लहू मस्के म्हणाले की, काही महिन्यापूर्वी पत्नी रेखा हीचे झालेले निधन मनाला चटका लावून गेले अर्ध्यावरती पत्नीने साथ सोडली पण तिची आठवण क्षणोक्षणी कायम सोबत आहे. माझ्या कठीण काळात पत्नी रेखा पहाडासारखी खंबीरपणे सोबत उभा होती, तिने मला कधीही खचू दिले नाही. तिच्याशिवाय हे जीवन परिपूर्ण नाही. उरलेलं आयुष्य रेखाने पाहिलेली स्वप्ने आणि मुलगा विहान याच्या जडणघडीसाठी असणार आहे. लहू मस्के असंही म्हणाले की, माणसांनी माणसे जपायला हवेत, एखादी व्यक्ती जेंव्हा कायमची साथ सोडून निघून जाते, तेंव्हा त्या वेदना अतीव असतात. यानंतरच्या काळात पत्नी रेखाच्या आठवणीत आपण विविध उपक्रम हाती घेणार आहोत. असा मानस लहू मस्के यांनी व्यक्त केला.
————-

COMMENTS