Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमध्ये २ महिलांना विवस्त्र करून रस्त्यावर फिरवलं

मणिपूर प्रतिनिधी - मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील काही पुरुषांनी 2 महिला

उत्तर भारतात थंडीची लाट ; महाराष्ट्र गारठला
कर्नाटकात ट्रक आणि कारचा भीषण अपघात
मुंबई महापालिकेची 3 हजार कोटी पाणीपट्टी थकली

मणिपूर प्रतिनिधी – मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील काही पुरुषांनी 2 महिलांना विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरुन फिरवल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांबरोबर या विषयी चर्चा करुन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आदिवासी संघटनेनं केलेल्या दाव्यानुसार या दोन्ही महिलांवर शेतामध्ये काही पुरुषांनी सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर या महिलांना नग्नावस्थेत रस्त्यावरुन फिरवण्यात आलं.  राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी पोलिसांना या प्रकरणाचा तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच मुख्य सचिवांशीही केंद्रीय महिला बालविकास मंत्र्यांनी चर्चा केली. तातडीने आरोपींवर कारवाई केली जाईल असं आम्ही त्यांना सांगितल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. आरोपींना कायद्यानुसार शिक्षा देण्यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी करु असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचंही सांगण्यात आलं आहे.

COMMENTS