Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यात गावठी कट्टासह सराईत गुन्हेगार जेरबंद

कोपरगाव शहर :शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राहुल संजय शिंगाडे रा सोनेवाडी ता कोपरगाव हा देर्ड

सिव्हील जळीतकांड तपासासाठी पोलिस बोलावणार एक्सपर्ट टीम ; तपासानंतर कलमांमध्ये होणार वाढ ?
अहमदनगरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा
माजी महिला नगराध्यक्षा ताडे यांची घरात गळफास घेऊन आत्महत्या

कोपरगाव शहर :शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राहुल संजय शिंगाडे रा सोनेवाडी ता कोपरगाव हा देर्डे फाटा, ता कोपरगाव शिवारात गावठी कट्टा विक्री साठी घेऊन घेणार आहे अशी बातमी मिळाली असता तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी सदर कारवाईसाठी त्यांचे तपास पथकातील पोहेकॉ इरफान शेख व पोहेको अशोक शिंदे यांना सदरची माहिती देऊन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी व त्यांचे पथकाची मदत घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले असता. तात्काळ कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पगार,पोकॉ अमोल धनवट, पोकॉ रशीद शेख यांचे स्वतंत्र पथक तयार करत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयाकडील तपास पथकाने संयुक्तरित्या मिळालेल्या बातमीनुसार पध्दतशीरपणे सापळा रचला असता सराईत गुन्हेगार राहुल संजय शिंगाडे वय 35 रा सोनेवाही ता कोपरगाव हा देर्डे ते पोहेगाव जाणार्‍या रोडने देर्डे शिवारात एका रेडीयमच्या दुकानासमोर ग्राहकाची वाट पाहत थांबलेला असताना त्यास कोणताही सुगावा न लागू देता अचानक त्याचेवर झडप घालून त्यास जेरबंद केले व त्याची झडती घेतली असता त्याचे कडे 25 हजार रुपये किमंतीचा एक गावठी बनावटीचा सिल्व्हर रंगाचा गावठी कटटा त्यामध्ये 3 जिवंत राऊंड असलेला मिळून आला असून त्यास तपास पथकाने ताब्यात घेऊन जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे शस्त्रबंदीचे आदेश असताना सुध्दा तो गावठी कटटा विक्रीसाठी आपले कब्जात बाळगताना मिळून आला म्हणून त्याचेविरुध्द कोपरगाव तालुका पो. स्टेशन येथे गु र नं. 349/2024 आर्म अ‍ॅक्ट 3/25, महा पो अधिनियम 37 (1) (3)135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कल्लुबमें यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी, उपनिरीक्षक दिलीप पगार, पोहेकॉ अशोक शिंदे, पोहेकॉ इरफान शेख, पोकॉ अमोल घनवट, पोकॉ रशीद शेख या पोलिस पथकाने केली असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पगार, पोकॉ अंबादास वाघ हे करीत आहेत.

COMMENTS