कोल्हापुरात आघाडीने गड राखला ; कॉंग्रेसच्या जयश्री पाटील विजयी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापुरात आघाडीने गड राखला ; कॉंग्रेसच्या जयश्री पाटील विजयी

कोल्हापूर/प्रतिनिधी :कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत भाजपने या जागेसाठी आपले सर्वस्व पणाला लावत, ही जागा जिंकण्याचा निर्धार केला होता, मात्र या नि

‘राधे श्याम’चं प्रदर्शन लांबणीवर ! LokNews24
भूमिपुत्रांच्या घरादारावर वरवंटा फिरवणार का ?
महाबळेश्‍वर तालुक्यात मुसळधार पाऊस; स्ट्रॉबेरीच्या शेतात पाणी साचले

कोल्हापूर/प्रतिनिधी :कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत भाजपने या जागेसाठी आपले सर्वस्व पणाला लावत, ही जागा जिंकण्याचा निर्धार केला होता, मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपला गड राखत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 19 हजार मतांनी विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून, निवडणूक प्रचारात मोठी रंगत आणली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भाजप आपल्याकडे मतदार खेचण्यात अपयशी ठरला. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असताना यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणुकीत उतरलेले आणि आता भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना भाजपने उमेदवारी दिली होती. गेले काही दिवस मविआ आणि भाजपाच्या राज्यभरातील प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडत राहिल्या. त्यामुळे आता या निकालाकडे सर्वाचेंच लक्ष लागले होते. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुसर्‍या फेरीपर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली होती. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कसबा बावडा भागातून मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव 2137 मतांनी आघाडीवर होत्या. जयश्री जाधव यांना 4856 तर भाजपाच्या सत्यजित कदम यांना 2719 मते मिळाली. दुसर्‍या फेरीत जयश्री जाधव यांना 5515 तर सत्यजित कदम यांना 2513 मते मिळाली. तर तिसर्‍या फेरीमध्ये जाधव यांना 4928 तर सत्यजित कदम यांना 2566 मते मिळाली. तिन्ही फेर्‍यानंतर जयश्री जाधव या 7501 मतांनी आघाडीवर होत्या. चौथ्या फेरीनंतर जयश्री जाधव यांना 3709 तर सत्यजित कदम यांना 3937 मते मिळाली. तर पाचव्या फेरीनंतर कदमवाडी, जाधववाडी,भोसले वाडी या भागातून सत्यजित कदम यांनी आघाडी घेत 4198 मते मिळवली आहेत. मात्र पुन्हा सहाव्या फेरीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने आघाडी घेतली आहे. सहाव्या फेरीत जयश्री जाधव यांनी 4689 तर सत्यजित कदम यांनी 2972 मते मिळवली. दहाव्या फेरीमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 2868 तर सत्यजित कदम यांना 3794 मते मिळाली. अकाराव्या फेरीत जाधव यांना 2870 तर कदम यांना 2756 मते मिळाली. 20 व्या फेरीनंतर काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी 15 हजार मतांची मोठी आघाडी घेतली होती. चोविसाव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 18 हजार 838 इतके मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर जयश्री जाधव यांनी 19 हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे.

कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला : जयश्री पाटील
काँगे्रसच्या आमदार जयश्री पाटील निवडून आल्यानंतर म्हणाल्या की, कोल्हापूरच्या जनेतेने शब्द पाळला आहे. चंद्रकांत जाधव यांच्यानंतर माझी जी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली आहे. कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला आहे. महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांनी मला सहकार्य केले. हा विजय माझ्या कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. चंद्रकांत जाधव यांनी जे पेरले तेच उगवले. मताधिक्य मिळणार याची अपेक्षा होती कारण जनता आमच्यासोबत होती.

COMMENTS