Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडगावमध्ये भरदिवसा तीन तोळ्याचे दागिने लांबविले

अहमदनगर/प्रतिनिधी ः केडगाव उपनगरामध्ये चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून, घर बंद करून कामावर गेलेल्या व्यक्तीचे घर फोडून चोरट्यांनी तीन तोळ्याचे सोन्य

ड्रायव्हिंग स्कुलमधून रोख रक्कम घेवुन चोरटे फरार
पनवेलमध्ये ज्वेलर्सच्या दुकानाला पाडले भगदाड !
मोटार वाईडींगचे दुकानातून 62 हजारांच्या साहित्याची चोरी

अहमदनगर/प्रतिनिधी ः केडगाव उपनगरामध्ये चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून, घर बंद करून कामावर गेलेल्या व्यक्तीचे घर फोडून चोरट्यांनी तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने व 10 हजाराची रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. केडगाव उपनगरातील दीपनगरमध्ये बुधवारी (दि. 28) दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी गौरव भास्कर विधाते (वय 21 रा. दीपनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव विधाते यांच्या आई स्वाती विधाते या एमआयडीसीत कामाला असून त्या बुधवारी सकाळी साडे आठ वाजता कामावर गेल्या होत्या. गौरव नऊ वाजता नेहमीप्रमाणे त्यांच्या डावरे गल्ली येथील पेरणा इंटरप्रायजेस येथे कामावर गेले होते. सायंकाळी साडे सहा वाजता स्वाती विधाते या घरी आल्यानंतर त्यांना घरफोडून दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्ष्यात आले. त्यांनी मुलगा गौरव यांना फोन करून माहिती दिली. गौरव यांनी घर गाठून पाहणी केली असता, घरातील कपाटामध्ये ठेवलेले दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण, दीड तोळ्याची सोन्याची पोत व 10 हजाराची रोकड असा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS