Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडमध्ये ओपन जेवू देईना क्लोज झोपू देईना !

मटक्यामुळे अनेकांचे जीवनमान बिघडले

जामखेड ः जामखेड शहर व तालुक्यात मटका, जुगार, दारू असे अवैध धंदे खुले आम पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहे. मटका जुगारामुळे अनेकांचे संसार मोडले आह

कोपरगावमध्ये शुक्र तीर्थ ऑडिओ बुकचे अनावरण  
टाकळीच्या शंभर वर्षाच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क
राहाता शहरामध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात

जामखेड ः जामखेड शहर व तालुक्यात मटका, जुगार, दारू असे अवैध धंदे खुले आम पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहे. मटका जुगारामुळे अनेकांचे संसार मोडले आहे. मटक्याच्या आहारी गेलेल्या नागरिकांची अवस्था ओपन जेऊ देईना आणि क्लोज झोपू देईना अशी झाली आहे. खुले आम चालू असलेल्या या अवैध धंद्याचा कधी बिमोड होणार  जामखेड पोलीसांच्या आशिर्वादाने या अवैध धंद्याना अभय मिळत आहे.अशी नागरिकात चर्चा आहे.
जामखेड शहर व तालुक्यात मटका, जुगार, दारू शहरातील बाजारतळ, बसस्थानक परिसर, जामखेड-नगर बीड-रस्त्यावर टप-यांमध्ये खुलेआम चालू असून फलक लावलेले आहेत. कल्याण व मुंबई मटका सकाळ पासून ते रात्री बारा एक वाजेपर्यंत चालू असतो. अनेकजण मटक्याचे रेकॉर्ड चाळत असतात. कल्याण मटका सकाळ नऊ ते एक या वेळेत ओपन तर चारच्या दरम्यान क्लोज येतो. तर मुंबई मटका दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओपन व रात्री बारा एकच्या सुमारास क्लोज येतो. यामुळे मटका खेळणार्‍याचे ओपन जेऊ देईना व क्लोज झोपू देईना अशी अवस्था झाली आहे. मटक्यामुळे अनेकांची झोप हैराण झाली असून अर्थिक गणित बिघडले आहे. जामखेड शहर व तालुक्यात किरकोळ कारणावरून हाणामा-या ही नित्याची बाब झाली आहे. गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दिवसाढवळ्या व्यापारी, व्यावसायिक यांना मारहाण व खंडणीचे प्रकार घडले आहेत. कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न, दुचाकीचे सायलेंसर काढून मोठ्याने होणारे आवाज, कट मारणे असे प्रकार होत आहेत.अनेक दोन नंबर करणारे व्हॉईट कॉलर वाढदिवसाचे औचित्य साधून मोठेमोठे बॅनर लावून दहशत पसरवण्याचा प्रयत्न प्रकार चालू आहे. सध्या आचारसंहिता असल्याने त्यावर थोडा लगाम आहे. खर्डा चौक, बीड कॉर्नर, जुने बसस्थानक, नवे बसस्थानक, चौफुला ह्या परिसराचे बॅनरबाजीने विद्रूपीकरण झाले आहे. हिट अँन्ड रन च्या घटना वाढल्या आहेत. तसेच सावकारकी फोफावली आहे.जामखेड चार जिल्ह्याच्या सिमेवर असल्याने राज्यातील व्हाईट कॉलरवाल्यांचा व गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा तेथे राबता असतो. 24 तास कलाकेंद्र पोलिसांच्या आशीर्वादाने चालू असतात. यापूर्वी तेथे खुनाच्या घटना घडल्या आहेत. जामखेड शहर व तालुक्यात अवैध धंदे व सातत्याने होणार्‍या मारहाणीच्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे.

COMMENTS