Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जकातवाडी-सोनगाव परिसरात बिबट्याने कोंबड्या केल्या फस्त

सोनगाव : कोंबड्या फस्त केल्यानंतर बिबट्याच्या पायाचे ठसे. सातारा / प्रतिनिधी : जकातवाडी-सोनगाव परिसरात बिबट्याची दहशत सुरू झाली आहे. रस्त्यालगत प्

फलटण तालुका सहकारी दुध संघाची निवडणूक बिनविरोध
कारखाने विक्री घोटाळ्याची ईडी-सीबीआय चौकशी करा ; शेतकरी कामगार महासंघाची सहकार परिषदेत मागणी
पाटण तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ भातासह सोयाबिनच्या पिकांचे मोठे नुकसान

सातारा / प्रतिनिधी : जकातवाडी-सोनगाव परिसरात बिबट्याची दहशत सुरू झाली आहे. रस्त्यालगत प्रवीण जाधव यांनी गावठी कोंबड्या बंदीस्त ठेवल्या होत्या. मात्र, बिबट्याने रात्रीच्यावेळी येऊन कोंबड्या पळवून फस्त केल्या आहेत.
येथील बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर सोनगाव येथे रस्त्यालगत प्रवीण जाधव यांनी शेतीस पूरक व्यवसाय म्हणून घाण्याच्या तेलासह गावरान कुकुटपालन हा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, एकाच आठवड्यात दोन वेळा बिबट्याने प्रवेश करून टप्प्या-टप्प्याने 10 कोंबड्या फस्त केल्या आहेत. सुमारे 8 हजाराचे नुकसान झालेले आहे. रात्रीच्यावेळी चाहूल लागताच प्रवीण जाधव यांनी कुत्र्यास सोबत घेऊन बिबट्याचा पाठलागही केला होता. मात्र, बिबट्यासमोर कुत्र्याची डाळ शिजली नाही. कोंबड्याची पिसे व बिबट्याच्या पायाची ठसे आढळून आली आहेत. यासंबंधी वनखात्यास कळविले असून त्यांच्या पध्दतीने बिबट्यास पकडण्यासाठी बंदोबस्त उपाययोजना सुरू आहे.

COMMENTS