Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला

गडचिरोली/प्रतिनिधी ः भूमकाल सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला आहे. नक्षलविरोध

नक्षलग्रस्त भागात गडचिरोली पोलीस दलाचे कार्य कौतुकास्पद : ना. शंभूराज देसाई
गोदावरी कालव्यातून तीन आवर्तने सोडण्यात येतील  – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
जय हिंद फाउंडेशनने पाथर्डी तालुक्यात लावली सर्वाधिक वडाची झाडे

गडचिरोली/प्रतिनिधी ः भूमकाल सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला आहे. नक्षलविरोधी अभियानादरम्यान अहेरी तालुक्यातील पेरमीली हद्दीत येणार्‍या वेडमपल्ली परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. चकमक स्थळावरून एक पिस्तुल, भरमार बंदुकीसह मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले.
रविवारी अहेरी तालुक्यातील वेडमपल्ली जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दडून बसलेल्या 20 ते 25 नक्षल्यांनी पोलिसांच्या विशेष पथकावर  गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील गोळीबार केला. दरम्यान पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. यावेळी चकमकस्थळी 1 पिस्तुल,1 भरमार बंदूक,1 वॉकीटॉकी चार्जरसह मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य आढळून आले. भूमकाल सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांना मिळालेले यश कौतुकास्पद असल्याचे गडचिरोली चे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला दक्षिण गडचिरोली भागात नक्षल चळवळीने डोके वर काढले असले तरी गडचिरोली पोलिसही त्यांना आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

COMMENTS