चाळीसगावच्या दिंडीत…रंगला रिंगण सोहळा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चाळीसगावच्या दिंडीत…रंगला रिंगण सोहळा

अहमदनगर/प्रतिनिधी : बालिकाश्रम रोडवरील लक्ष्मीमाता मंदिर परिसरात श्रीक्षेत्र चाळीसगाव ते पंढरपूर पायी दिंडीच्या रिंगण सोहळ्यात परिसरातील महिलांचा उत्

खेलो इंडिया यूथ गेम्स; आर्चरीमध्ये आदितीचा सुवर्णवेध तर पार्थ कोरडेला रौप्यपदक
अहमदनगर जिल्ह्यात नव्या ३७८० बाधितांची रुग्ण संख्येत भर
नामदार थोरात यांनी केली गंगामाई घाट परिसराची पाहणी

अहमदनगर/प्रतिनिधी : बालिकाश्रम रोडवरील लक्ष्मीमाता मंदिर परिसरात श्रीक्षेत्र चाळीसगाव ते पंढरपूर पायी दिंडीच्या रिंगण सोहळ्यात परिसरातील महिलांचा उत्साही सहभाग होता. ह.भ.प. कृष्णा महाराज देशमुख यांच्या श्रीक्षेत्र चाळीसगाव ते पंढरपूर पायी दिंडीचे बालिकाश्रम रोडवरील लक्ष्मीमाता मित्र मंडळ व महिला मंडळ आणि विजयदीप मित्र मंडळ यांच्यावतीने स्वागत करून पूजन करण्यात आले. यावेळी किरण कोकणे, सुरेश जाधव, सुनील म्हस्के, बाळासाहेब कारले, उदय म्हस्के, अक्षय जाधव, योगेश जाधव, प्रवीण कोकणे, प्रा.प्रकाश कोकणे, विनोद शिंदे व परिसरातील महिला उपस्थित होते.
सलग 23 वर्षा पासून या दिंडीतील वारकरी यांची सेवा व सुविधा जाधव मळा व ढोर वस्ती परिसरातील नागरिक करीत आहेत. लक्ष्मीमाता मंदिरासमोर या दिंडीतील वारकरी, परिसरातील महिला व बाल वारकरी यांचा रिंगण सोहळा रंगला. ह.भ.प.कृष्णा महाराज तसेच परिसरातील महिलांनी यावेळी पारंपरिक फुगडी खेळ सादर केला. त्यानंतर महाप्रसाद वाटप झाले. रात्री कीर्तन कार्यक्रमात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मार्कंडेय दिंडीचे प्रस्थान
नगरहून पंढरपूर येथे गेल्या 25 वर्षांपासून पायी अव्याहतपणे श्रीविठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी जाणार्‍या पदमशाली समाजाच्या श्री मार्कंडेय महामुनी दिंडी सोहळा (ट्रस्ट)च्या दिंडीचा प्रारंभ गांधी मैदानातील श्रीमार्कंडेय मंदिरातून ह.भ.प. दहिफळे महाराज यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. आता नाचत-गात पंढरीला दर्शनाला जाऊ…विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल…अशा नामघोषात सुरु झालेली ही दिंडी नवमीला पंढरपूरला पोहोचेल. नगरमधील पदमशाली समाजातील भाविक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले आहेत.

COMMENTS