देवळाली प्रवरा ःआत्ता पर्यंत मानव जातीचा दशक्रियाविधी करतात हे सर्वांनाच ज्ञात आहे. परंतू जग बदलत चाललय देवळाली प्रवरा येथे नगर पालिकेतील सेवानिव

देवळाली प्रवरा ःआत्ता पर्यंत मानव जातीचा दशक्रियाविधी करतात हे सर्वांनाच ज्ञात आहे. परंतू जग बदलत चाललय देवळाली प्रवरा येथे नगर पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी कुंडलिक खरात पाळीव कुत्रा बच्चु नावाच्या कुञ्याचा दशक्रियाविधी घालुन त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी भावना खरात कुटुंबाने व्यक्त केली आहे.
आत्तापर्यंत कुठेही पाळीव कुञ्याचा दशक्रिया विधी केलेला पाहिला नाही. देवळाली प्रवरा येथिल नगर पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी कुंडलिक खरात त्यांनी बच्चु नावाचा एक कुत्रा पाळला त्याच्यावर मुलाप्रमाणे प्रेम केले.तो कुत्रा इतका हुशार आणि चतुर होता. की घरातील सर्व सदस्य त्याच्या प्रेमात पडले.तो कुञा त्यांच्या कुटुंबातील सदस्य बनला होता.लहाना पासुन ते मोठ्या माणसां पर्यंत सर्व जण त्याच्यावर जीवापाड प्रेम करायचे 16 वर्षानंतर बच्चू नावाचा तो कुत्रा 19 मे 2024 अचानक मृत्यू ओढवला त्याच्या मृत्यूने सर्वांची मने दुःखवली गेली.कुटुंबातील सर्व सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना कुंडलिक खरात यांच्या तीनही मुलांनी दशक्रिया विधी घालण्याचे ठरविले.त्यानुसार बच्चुचा दशक्रियाविधी दि.29 मे 2024 ला केला.बच्चु कुत्र्याच्या दशक्रिया विधीसाठी 200 लोकांचा पाचीपक्वनाचा स्वयंपाक केला. दशक्रियाविधी निमित्त ह.भ.प. बाबा महाराज मोरे यांचे प्रवचन ठेवण्यात आले.मणुष्य प्राणी संगणक युगात दुरावला जात आहे.माणूस माणसांशी बोलणे बंद झाले आहे.मानवता धर्म कमी होत आहे.खरात कुटुंबाने माञ मुक्या प्राण्यावर प्रेम करुन त्या बच्चू नावाच्या कुञ्याचा दशक्रियाविधी घालुन पाळीव कुञा बच्चूवरील प्रेम व्यक्त केले.
COMMENTS