Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये तलवार व सुरा घेऊन फिरणार्‍याला पकडले

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांची आल्याबरोबरच कारवाई

बीड प्रतिनिधी - हातात तलवार आणि सुरा - घेवून फिरणार्‍या दोघांना शहर ठाण्याचे पो. नि. मुकूंद कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने गजाआड केले. यावेळी त्या

पहाटेच्या सुमारास स्फोटाने कराड हादरलं
पुणतांब्यात विरोधकांनी जल जीवन मिशनचे काम केले बंद
समृद्धीवर अपघात कमी करण्यासाठी सुविधा वाढवणार

बीड प्रतिनिधी – हातात तलवार आणि सुरा – घेवून फिरणार्‍या दोघांना शहर ठाण्याचे पो. नि. मुकूंद कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने गजाआड केले. यावेळी त्यांच्याकडील तलवार आणि सुरा जप्त करण्यात आला असुन गुन्हा दाखल झाला आहे.
बीड शहरातील राजुरी वेस भागात हातात तलवार घेवून फिरत असतांना पोलीसांनी शेख हाफीज शेख मुजीब (वय 48 रा. बुंदेलपुरा, बीड) याला ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलीस अंमलदार मनोज परजणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे तर दुसरी कारवाई कटकटपुरा भागात करण्यात आली. याठिकाणी सादखान सुलतानखान (वय 20 रा. जुनी भाजी मंडई,बीड) हा लाकडी मुट असलेला लोखंडी सुरा हातात घेवून फिरत असतांना पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले. या प्रकरणात पो.कॉ. राहुल गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून साद खान याच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही प्रकरणात 4/25 आर्म क्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. मुकूंद कुलकर्णी, पीएसआय पवार, गव्हाणे, पोलीस अंमलदार बाळासाहेब सिरसाट, सय्यद अश्फाक, मनोज परजणे, गुंजाळ, सुशेन पवार यांनी केली.

COMMENTS