Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संक्रापूर येथील जळालेली डीपी त्वरित बसवा

राहुरी येथील शेतकर्‍यांची मागणी

बेलापूर/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील जाधव डीपी नादुरुस्त होवुन अठरा दिवस होवुनही नवीन डीपी न आल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात भ

वारीत दशावतारी आखाडीचे आयोजन
महिलेचा विनयभंग, पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल
दादा पाटील महाविद्यालयात गुणवंत कलाकारांचा सन्मान

बेलापूर/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील जाधव डीपी नादुरुस्त होवुन अठरा दिवस होवुनही नवीन डीपी न आल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात भरुन न येणारे नुकसान होत असून तातडीने डीपी देण्याची मागणी येथील शेतकर्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की संक्रापुर तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र येथील जाधव डीपीवर मोठ्या प्रमाणात शेतकरी अवलंबून असून हे ट्रान्सफार्मर जळुन अठरा दिवस झाले अजुनही दुरुस्त करुन मिळालेले नाही या बाबत महावितरणकडे वारवार मागणी करुनही डीपी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्या जनता दरबारात देखील ही समस्या मांडलेली आहे त्या घटनेस देखील सहा दिवस उलटुन गेलेले आहे. वीज नसल्यामुळे सर्व पिके जळून चाललेली आहेत. जनावरांच्या चारा पाण्याचाही प्रश्‍न निर्माण झाला असून आपणच आमचे मायबाप आहात. आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मेलद्वारे केली आहे. या निवेदनावर देविदास देसाई, कल्याणराव जगताप, नबाजी जगताप, बाळासाहेब जाधव, नारायण जाधव, बाळासाहेब गुंड, नंदकुमार लोंढे, वसंत बर्डे, संपतराव होन, पंडीतराव थोरात, विश्‍वनाथ जगताप, विकास पा थोरात, कचेश्‍वर जगताप, राजेंद्र जगताप, विश्‍वनाथ पवार, वसंत लोखंडे, बाजीराव जगताप आदीच्या सह्या आहेत.

COMMENTS