Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्‍वासन आठ जिल्ह्यात 13 हजार 729 हेक्टर शेतीचे नुकसान

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, गहू, कांदा, आंबा, हरभरा, द्राक्षांच्या बागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्यामु

‘ऑक्सिजन पार्क’मधील ऑक्सिजन गायब… नागरिक आंदोलनाच्या तयारीत
मध्य रेल्वेची लोकल सेवा पुन्हा खोळंबा
Nanded : देगलूर मध्ये ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूलचे पूर्वतयारी व निर्जंतुकीकरण

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, गहू, कांदा, आंबा, हरभरा, द्राक्षांच्या बागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीची मदत देण्याची मागणीविरोधकांकडून विधिमंडळात उपस्थित करण्यात आला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना आश्‍वस्त करत, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत देऊन असे आश्‍वासन दिले.

अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे 13 हजार 729 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तत्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य नाना पटोले, छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, पालघर जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार येथे 760 हेक्टरचे नुकसान झाले असून नाशिक जिल्ह्यात 2685 हेक्टरचे नुकसान झाले आहे. धुळे येथे 3144 हेक्टर, नंदूरबार येथे 1576 हेक्टर, जळगाव येथे 214 हेक्टर, अहमदनगर येथे 4100 हेक्टर, बुलढाणा येथे 775 हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात 475 हेक्टर शेतीचे नुकसन झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. नुकसानासंदर्भात अधिकची माहिती घेण्यात येत असून तत्काळ मदतीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, अहवाल प्राप्त होताच सभागृहात याबाबत निवेदन करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, विधिमंडळात विरोधकांकडून सरकारला धारेवर धरत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ मदत करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बोलतांना आमदार छगन भुजबळ म्हणाले की, अवकाळी पावसामुळे प्रचंड असे नुकसान झाले असून काही ठिकाणी द्राक्षाच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकर्‍यांना पुन्हा नव्याने या बागा उभ्या करावे लागणार आहे. त्यामुळे हे द्राक्ष शेतकरी आता पाच वर्ष मागे गेला आहे. कांदा, गहू, हरबरा, आंबा, भाजीपाला यासह अनेक शेती पिकाचे मोठ नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशा आपले तोंड बडवून घेत आहे. आज महिला दिन साजरा होत असताना माय माऊली देखील आपण तोंड बडवून घेत रडताय ही अतिशय गंभीर बाब आहे.

कांदा उत्पादकांना अनुदान द्या ः भुजबळ
राज्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले असून एकीकडे होळी साजरी होत असतांना शेतकर्‍यांच्या पिकांची होळी झाली. तर धुळवडीचे रंग खेळले जात असतांना शेतकर्‍यांचे जीवनच बेरंग झाले. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना तातडीने मदत घोषित करण्याची गरज आहे. गुजरात सारख्या राज्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्यावर 350 कोटी रुपयांची मदत घोषित केली. महाराष्ट्रात तर सर्वाधिक कांदा उप्तादक शेतकरी असतांना अद्याप महाराष्ट्र सरकारकडून शेतकर्‍यांना मदत का नाही, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थितीत केला.

COMMENTS