Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात बेकायदेशीर इंधनविक्रीचे रॅकेट उघडकीस

पुणे ः बेकायदेशीररीत्या पेट्रोल व डिझेल चोरी करणार्‍या टोळीचा हडपसर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. त्यांच्याकडून दोन कोटी 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

Indapur : गांजा तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत (Video)
राहुरीत आजी-माजी आमदारांमध्ये रंगला कलगीतुरा
पुण्यातील आमदाराच्या मामाचेच अपहरण

पुणे ः बेकायदेशीररीत्या पेट्रोल व डिझेल चोरी करणार्‍या टोळीचा हडपसर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. त्यांच्याकडून दोन कोटी 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 24 हजार लीटर इंधन, आठ टँकर, 14 कॅन अशा ऐवजाचा समावेश आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुनिलकुमार प्राननाथ यादव (वय 24 रा. हडपसर, मुळ रा.प्रतापगढ, लालगंज, उत्तरप्रदेश) दाजीराम लक्ष्मण काळेल (वय 37 मूळ- वळई ता. माण, सातारा ) ,सुनिल रामदास तांबे (वय 38 रा. हडपसर) ,सचिन रामदास तांबे (वय 40 रा. हडपसर), शास्त्री कवलु सरोज (वय 48 रा.हडपसर), अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलिस आठ एप्रिलला हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, पोलिस अंमलदार मनोज सुरवसे यांना अवैध इंधन विक्रीची माहिती मिळाली होती. वाशी नवी मुंबई येथुन एटीफ पेट्रोल (विमानासाठी वापरण्यात येणारे पेट्रोल) डिझेल भरुन टँकर शिर्डी एअरपोर्टकडे जाणार होते. संबंधित टँकर कंपनीकडून प्रवासाचा मार्ग वेळ नियोजीत आणि टँकरला अ‍ॅटोलॉक असतानाही आरोपींकडून इंधनाची चोरी वारंवार होत होती. त्यामुळे पोलिस पथकाने हडपसर परिसरात छापा टाकला असता, आरोपी टँकरमधून इंधनाची चोरी करताना मिळून आले आहे. संबंधित ठिकाणाहून दोन इंधन भरलेले टँकर, आठ मोकळे टँकर, 14 कॅन असा 2 कोटी 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एचपीसीएल कंपनीचे अधिकार्‍यांसह पोलिस अधिकारी मिळून पंचनामा केल्याचे पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा एसीपी बजरंग देसाई, वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्‍वास डगळे, एपीआय विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांनी केली आहे.

COMMENTS